सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

'सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण आणि बाप मराठा' आमदार गोपीचंद पडळकरांची नाव न घेता पवार कुटुंबावर टीका

डिजिटल पुणे    09-07-2025 12:43:22

पुणे : आपल्या वादग्रस्त विधानांमुळं नेहमी चर्चेत असणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारी नाव न घेता पवार कुटुंबावर टीका केली. "माझ्या विरोधात जे काही मोर्चे काढले जात आहेत. त्यात एका गटाचे लोक पुढं आहेत. एकादशीच्या दिवशी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मटण खाऊन जातात. त्यांची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, अशी कॉकटेल फॅमिली आहे. ती फॅमिली माझी आमदारकी गेली पाहिजे म्हणून मोर्चामध्ये सहभागी होते," असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेतं पवार कुटुंबावर टीका केली.

 सांगलीमधील ऋतुजा पाटील प्रकरणात राजगे कुटुंबीयांनी हिंदू असल्याचं भासवून लग्न केलं. लग्नानंतर धर्मांतर करण्यासाठी राजगे कुटुंबीयांनी ऋतुजाचा अनन्वित छळ केला. सततच्या छळाला वैतागून 7 महिन्यांच्या गरोदरपणात धर्माभिमानी ऋतुजानं आत्महत्या केली. धर्मांतराचा कठोर कायदा व्हावा, राजगे कुटुंबाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुण्यात हिंदूच्या भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पडळकर उपस्थित होते. यावेळी भाषण करताना त्यांनी पवारांचं नाव न घेता टीका केली. "एकादशीच्या दिवशी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मटण खाऊन जातात. त्यांची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, अशी कॉकटेल फॅमिली आहे. ती फॅमिली माझी आमदारकी गेली पाहिजे म्हणून मोर्चामध्ये सहभागी होते," असं म्हणत त्यांनी पवार कुटुंबावर टीका केली.

 "ऋतुजाचं लग्न लॉकडाऊनमध्ये झालं. लग्नानंतर काय घडलं हे आपल्याला माहीत आहे. लग्नानंतर तिला धर्मांतर करण्यासाठी तिचा छळ करण्यात आला. परंतु तिनं धर्मांतर न करता आत्महत्या केली. ऋतुजानं केलेली आत्महत्या नाही तर ती तिच्या सासरच्या लोकांनी घडवून आणलेली हत्या आहे. धर्मांतराचे प्रकार घडू नयेत म्हणून धर्मांतर बंदी आणि लव्ह जिहादबाबतचा कठोर कायदा महाराष्ट्र सरकारनं आणावा अशी आमची मागणी आहे," असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

"सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार जर एखाद्या हिंदू कुटुंबातील व्यक्तीनं आपल्या जातीच्या दाखल्याच्या आधारे नोकरी मिळवली असेल आणि त्यानंतर त्यानं धर्मांतर केलं असेल तर त्याला बडतर्फ करण्यात यावं. आता आम्ही ज्यांनी नोकरीचं आरक्षण घेतलं आहे आणि धर्मांतर केलं आहे अशा लोकांची कुंडली काढणार आहोत. ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळवली आहे आणि त्यानंतर धर्म बदलला. त्याबाबतचे पुरावे गोळा करीत आहोत," असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.


 Give Feedback



 जाहिराती