सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज; राहूल नार्वेकरांवर आमदार नितीन देशमुख यांचा गंभीर आरोप

डिजिटल पुणे    14-07-2025 17:13:09

मुंबई : कार्यालयातील महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. या मुद्यावर लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती. मात्र, संपूर्ण प्रकरणात लक्षवेधी न होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. 

अकोल्यातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यलयात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख  यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. गेल्या २ तासांपासून आमदार देशमुख यांचे हे आंदोलन सुरु आहे. 

नेमकी घटना काय?

मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यलयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुर्तिजापूर उपविभागीय अधिकारी डि.बी कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे असे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहे. दरम्यान, या दोघांनाही पदावरून बडतर्फ करण्यात यावं, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार नितीन देशमुख यांच ठिय्या आंदोलन सुरू आहे.

पिडीत महिलेचा गंभीर आरोप

या संपूर्ण प्रकरणावर महिला कम्प्युटर ऑपरेटर हिने ज्यांच्यावर आरोप केलेत त्या कपिले यांच्यामागे मुर्तीजापुर मतदारसंघाचे आमदाराचे पाठबळ असल्याचा दावा केला आहे. आपल्याला वारंवार तक्रारी करूनही पैशांमुळे कुठेच न्याय मिळाला नसल्याचा आरोप पिडीत महिलेने केलाय.

हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करुन दिला नाही. 

देशमुख हा मुद्दा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातदेखील उपस्थित करणार होते. त्यासाठी त्यांनी सभागृहात चर्चा होण्यासाठी लक्षवेधीचा प्रस्तावसुद्धा दिला होता. या लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती. मात्र या संपूर्ण प्रकरणात लक्षवेधी न होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. 


 Give Feedback



 जाहिराती