मुंबई :- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या मुंबई महानगर कार्याध्यक्षपदी शशिकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका कल्याण येथील विशेष कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, मुंबई अध्यक्ष संजय भैरे व राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक नलावडे यांच्या हस्ते देशमुख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर डुकरे हे उपस्थित होते.
डिजिटल पत्रकारांची देशातील पहिली संघटना म्हणून ओळख असलेल्या संघटनेचे काम मुंबई महानगरात अधिक गतिमान करण्याची ग्वाही यावेळी शशिकांत देशमुख यांनी दिली.मुंबई महानगर अध्यक्ष संजय भैरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,दिपक नलावडे यांनीही शुभेच्छा दिल्या.राजा माने यांनी संघटनेचा विस्तार देश पातळीवर होत असल्या बद्दल व राज्यातील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही सर्वात मोठी संघटना असल्याचे समाधान व्यक केले. डिजिटल पत्रकारितेच्या गुणात्मक विकासाबरोबरच पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी संघटना परिश्रम घेत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय काटे, सुनील कसबे ,संतोष पाटील, प्रवीण खडतरे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
