सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

डिजिटल पुणे    15-07-2025 14:22:48

छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदान केंद्राची संख्या निश्चित करताना काळजीपूर्वक निश्चित करा, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, नगरविकास विभागाचे सह आयुक्त देविदास टेकाळे, सहायक आयुक्त संजय केदार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह नगरप्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान विभागीय आयुक्त पापळकर यांनी जिल्हानिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीबाबत माहिती जाणून घेतली. मतदार संख्या, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम), मतदान केंद्रांची व्यवस्था आणि इतर अनुषंगिक तयारी मतदान केंद्रांची रचना आणि निवडणूक प्रक्रियेच्या तयारी, मतदान केंद्रांवर पाणी, वीज, स्वच्छतागृहे यासारख्या मूलभूत सुविधा, ईव्हीएम सुरक्षितता आदी तयारीचा आढावा घेत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित व्यवस्थेची पाहणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती