सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 विश्लेषण

केसरी वृत्तपत्राचे संपादक आणि लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक यांचे निधन

गजानन मेनकुदळे    16-07-2025 10:46:39

पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दीपक टिळक यांचे पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजारामुळे निधन झाले. ते चौर्‍याहत्तर वर्षांचे होते. दीपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती होते. त्यासोबतच ते अनेक संस्थांचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र अखेरचा श्वास त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरी घ्यायचा होता. त्यामुळे त्यांना केसरी वाड्यातील त्यांच्या घरी आणण्यात आले. आज पहाटे त्यांचे निधन झाले. सकाळी आठ ते अकरा या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी केसरी वाड्यामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. दीपक टिळक यांच्या निधनामुळे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त केली जात आहे.

डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले असून, टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेला. डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. त्यांनी ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद भूषवले आहे. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. दीपक टिळक यांच्या पश्चात काँग्रेस नेते असलेले सुपुत्र रोहित टिळक, कन्या, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी बारा वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 


 Give Feedback



 जाहिराती