उरण : उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा, या विद्यालयातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना आजतागायत सातवा वेतन आयोग नव्याने विदयालयाचा कार्यभार स्विकारणाऱ्या संस्थेने लागू केलेला नाही. परंतु सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे चालू असलेल्या वेतनामध्ये जुलै - २०१९ पासून वार्षिक वेतनवाढ आणि त्या अनुषंघाने राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर करण्यात आलेला महागाई भत्ता गेली सात वर्षे न दिल्यामुळे शिक्षकांवर फार मोठा अन्याय रुस्तमजी फॉउंडेशन या संस्थेने चालविलेला आहे.
सदरील सात वर्षांची थकीत रक्कम फरकासह शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा न झाल्यास दिनांक ११/०८/२०२५ पासून जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय - शेवा, माध्यमिक इमारतीच्या गेटसमोर सर्व शालेय कर्मचारी शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण करणार आहेत. या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित शिक्षण संस्थेची व महाराष्ट्र राज्याची असेल असा इशारा शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, ज.ने.पो.वि. शेवा, ता. उरण,जिल्हा- रायगड यांनी प्रशासनाला दिला आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेवा येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी रुस्तमजी केरावाला फाउंडेशनच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व शासकिय कार्यालयामध्ये विविध प्रलंबित समस्या व मागण्या संदर्भात निवेदन देऊन सदर प्रश्न, समस्या सोडविण्याकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विनंती केलेली होती परंतु आजतागायत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा एकही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचेड असंतोष निर्माण झालेला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याची मानसिकता ढासललेळी आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याची आर्थिक कुचंबणा करण्याचे काम या संस्थेने चालू ठेवलेले आहे. वारंवार शालेय समितीमध्ये शिक्षक प्रतिनिधींनी विविध समस्या, मागण्याचे विषय काढुनसुदधा संस्थेच्या प्रशासनाने डोळेझाक केलेली आहे आणि म्हणूनच सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे चालू असलेल्या वेतनामध्ये जुलै - २०१९ पासून वार्षिक वेतनवाढ आणि त्या अनुषंघाने राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर करण्यात आलेला महागाई भत्ता गेली सात वर्षे न दिल्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय या संस्थेने चालविलेला आहे. सदरील सात वर्षांची थकीत रक्कम फरकासह सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईपर्यंत दिनांक ११/०८/२०२५ पासून जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय - शेवा, माध्यमिक इमारतीच्या गेटसमोर सर्व शालेय कर्मचारी शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण करणार आहेत.या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व रुस्तमजी फॉउंडेशन यांची राहिल असा इशारा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दिला आहे.जेएनपीए अंतर्गत सुरु असलेल्या सदर विदयालयात १०१ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत असून केजी ते १० पर्यंतची इंग्रजी, मराठी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत २४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या समसयेवर लवकर तोडगा न निघाल्यास २४०० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार आहे.त्यामुळे पालक वर्गांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.