धानोरी : आखाड रविवार २० जुलैच्या निमित्ताने धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशन च्या वतीने पुणे मनपा प्रभाग क्र.१ मधील नागरिकांसाठी चिकन चे मोफत वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. श्रमिकनगर, भैरवनगर, सादबानगर, मुंजाबावस्ती, परांडेनगर व जकात नाका येथे रविवारी वाटप करण्यात येणार आहे.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विश्रांतवाडी येथून जाणार असल्याने कळस व विश्रांतवाडी येथील वाटप बुधवारी करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी दिलगीरी व्यक्त करून कळवले आहे.प्रभागातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे, फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ.पुजा जाधव यांनी सांगितले.