सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सिनेमाच्या शूटिंगवेळी ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी, उपचारासाठी अमेरिकेला रवाना; चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू;
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 शहर

पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे जल्लोषात उदघाटन

डिजिटल पुणे    19-07-2025 15:38:18

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्य स्तरावर सायकल स्पर्धेचे उदघाटन राज्यसभा सदस्य आदरणीय खा. सुनेत्रा वहिनी पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, सायकलिंग फेडरेशन इंडियाचे महा सचिव मा. मनिंदर सिंग यांच्या शुभहस्ते शनिवारवाडा (पुणे) येथे मोठ्या जल्लोषात करण्यात आले.शनिवारवाडा ते हडपसर सायकल रॅली स्पर्धाविरहीत (न्युट्रल झोन) निघणार मुख्य राष्ट्रीय व राज्यस्तर सायकल स्पर्धेचे उद्घाटन हडपसर ग्लायडिंग सेंटर येथे होणार आहे.


याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष मा. सुभाष जगताप, कार्याध्यक्ष मा. प्रदीप देशमुख, मा. अॅड. रुपाली पाटील ठोंबरे, सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष मा. अॅड. विक्रम रोठे, सचिव संजय साठे,माजी नगरसेवक मा. नंदा लोणकर, मा. नारायण लोणकर, मा. करीम लाला, सनदी अधिकारी विजयसिंह देशमुख, मा. शिवाजी काळे तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव मा. अॅड. संदीप कदम, खजिनदार मा. अॅड. मोहनराव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धा तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धा व संस्थेच्या गुणात्मक वाढीचा आढावा घेतला. तसेच पुणे ते बारामती सायकल रॅलीचे हे नववे वर्ष असल्याचे नमूद करत या स्पर्धेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नावर जनजागृती करण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा शिक्षण मंडळ करत असल्याचे नमूद केले.


राज्यसभा सदस्य आदरणीय खा. सुनेत्रावहिनी पवार यांनी सायकल रॅलीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा देत उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला. उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे कौतुक केले.


उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शनिवार वाडा येथून हिरवा झेंडा दाखवत या सायकल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये आंध्र प्रदेश, सेना दल, वायुदल, अंदमान व निकोबार, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, रेल्वे अशा देशाच्या विविध भागातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले असून बारामती येथे या स्पर्धेचा समारोप होणार आहे.या सायकल रॅलीच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व कार्यालयीन कर्मचारी, संस्थेशी संलग्नित सर्व शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले असून निरोगी आरोग्य व विविध सामाजिक संदेश देणाऱ्या या सायकल रॅलीच्या आयोजनाबद्दल सर्व स्तरातून पुणे जिल्हा शिक्षण मंडळावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम व ढोल ताशांच्या आवाजाने वातावरणात उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड व अमृता खराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती