सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मुंबईत 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
  • सिनेमाच्या शूटिंगवेळी ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी, उपचारासाठी अमेरिकेला रवाना; चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू;
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी

डिजिटल पुणे    21-07-2025 16:07:40

सांगली : कै. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करणे, स्मारकाचे नूतनीकरण व मजबुतीकरण यासाठी शासनास जवळपास 8 कोटी 28 लाख रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्या प्रस्तावास शासन स्तरावरून मंजुरी व आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, जयश्री पाटील, समित कदम, वास्तुविषारद प्रमोद चौगुले यांच्यासह शासकीय अधिकारी आदि उपस्थित होते.

प्रारंभी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांना अभिवादन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी करून उर्वरित कामांचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारकाकरिता प्राप्त अनुदान, शिल्लक अनुदान, बँक खात्यातील जमा व्याज, उर्वरित बांधकाम व नवीन बांधकामासाठी सुधारित अंदाजपत्रक, स्मारकाचे नूतनीकरण व मजबुतीकरणासाठी आवश्यक निधी आदि बाबींचा आढावा यावेळी घेतला.


 Give Feedback



 जाहिराती