सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मुंबईत 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
  • सिनेमाच्या शूटिंगवेळी ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी, उपचारासाठी अमेरिकेला रवाना; चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू;
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन; पावसाळी अधिवेशन, PM मोदींच्या भाषणात 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख

डिजिटल पुणे    21-07-2025 17:54:25

नवी दिल्ली :  आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात PM मोदींनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख करत भारताची लष्करी ताकद जगासमोर मांडली. ते म्हणाले, 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यांनी आयएसएसवर तिरंगा फडकवणाऱ्या अंतराळवीर शुभांशूचे अभिनंदन केले. अधिवेशन 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान होणार असून 18 बैठका होतील. 8 नवीन आणि 7 प्रलंबित विधेयकांवर चर्चा होणार आहे. नवीन आयकर विधेयकावर समितीने 285 शिफारसी दिल्या असून, हे विधेयक 1961 च्या कायद्याची जागा घेईल.

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. 21 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु होत असून या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’सह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यस्थीचे दावे, बिहारमधील मतदार फेरपडताळणी या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व महत्त्वाच्या मुद्द्यावर नियमानुसार चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. तर महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावं,अशी अपेक्षा ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये 51 राजकीय पक्षाचे 54 सदस्य उपस्थित होते.

विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहांत चर्चेला उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली. त्यामुळे अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती