उरण : निसर्गाचे रक्षण व्हावे तसेच शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त स्थिर उत्पन्न मिळून त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्थर उंचवावा या उद्देशाने पाले गावात श्रीया फाऊंडेशन पाले च्या वतीने रविशेठ भोईर महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य व उरण विधानसभा अध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते मोफत शंभर आंब्याच्या कलमांचे वाटप करण्यात आले. यावेळी श्रीया फाऊंडेशन पाले संस्था करीत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचे कौतुक करण्याबरोबरच उपस्थितांना मार्गदर्शन करताना झाडे लावणे काळाची गरज आहे व त्याचे संगोपन करणे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने वर्षातून किमान एक तरी झाड लावावे व ते पूर्णपणे जगवावे असे रवीशेठ भोईर यांनी उपस्थितांना आवाहन केले.
तर श्रीया फाऊंडेशन पाले च्या अध्यक्षा स्मिता म्हात्रे यांनी पाले गावातील शेतकऱ्यांना शेती बरोबरच पूरक व कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्न मिळावे व त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा म्हणून श्रीया फाऊंडेशन पाले संस्थेच्या वतीने शंभर आंब्याच्या कलमांचे वाटप करत आहोत असे त्या म्हणाल्या. यावेळी ऋषिकेश म्हात्रे मॅनेजर जेएनपीए, धनेश गावंड उरण तालुका अध्यक्ष भाजपा, शशी पाटील उरण पूर्व विभाग अध्यक्ष, देवेंद्र पाटील उद्योगपती खोपटे, जीवन गावंड माजी जिल्हा परिषद सदस्य, अमित म्हात्रे पाले गाव अध्यक्ष, चंद्रकांत म्हात्रे निवृत्त पोलीस निरीक्षक, पोसुराम म्हात्रे निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक, पंकेश म्हात्रे आवरे पंचायत समिती युवा अध्यक्ष, धर्मा म्हात्रे, गजानन म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, राजेश म्हात्रे, विनोद म्हात्रे, अनिल म्हात्रे, गंगाराम म्हात्रे, अविनाश म्हात्रे , संदीप म्हात्रे, अजित म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, अजय म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या देवयानी म्हात्रे, रुपाली म्हात्रे, प्रगती म्हात्रे, अनिता फडके , शैला म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.