सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 व्यक्ती विशेष

महाराष्ट्रात आणि पुण्यात उद्योग क्षेत्रात आम्ही दादागिरी खपवून घेणार नाही. - अजित पवार

डिजिटल पुणे    02-08-2025 16:12:40

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी ही दुर्देवाने पुण्याच्या विकासात सर्वात मोठा अडथळा ठरत आहे', असे विधान करताच राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधकांकडून दादगिरी करणाऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी होत आहे. अशातच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि महाराष्ट्रात आम्ही इंडस्ट्रीत दादागिरी खपवून घेणार नाही, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात सूचन दिल्या आहेत. तसेच, कुणी न ऐकल्यास त्यांच्यावर मोकोका दाखल करा, असे निर्देशदेखील पवारांनी यावेळी दिले आहेत.

 अजित पवार नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रात आणि पुण्यात उद्योग क्षेत्रात आम्ही दादागिरी खपवून घेणार नाही. पुणे, पिंपरी- चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत. कोणत्याही पक्षाशी संबंधीत असणारे उद्योगवाल्यांना जर त्रास देत असतील, काही अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. कारवाई करा. तीन चार वेळा जर गुन्हा दाखल करुन जरी ऐकले नाही तर त्यांच्यावर मकोका लावा इथपर्यंतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

तसेच, पुण्यातच नव्हे राज्यात असणाऱ्या उद्योग क्षेत्रात नव्याने येणाऱ्या उद्योगपतींना त्यांची गुंतवणुक केल्यानंतर, त्यांना जी काही मदत असेल, जी काही सुविधा असेल त्यांना सहकार्य करण्याचे काम आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम महायुतीचे असेल. असेही यावेळी पावरांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती