सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 DIGITAL PUNE NEWS

शेती विकण्यावरून वाद! मुलाने केला आईचा गळा आवळून खून, नंतर स्वत:ला संपवलं

डिजिटल पुणे    09-08-2025 14:21:41

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे आई–मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या खर्चासाठी झालेलं कर्ज फेडण्यासाठी शेती विकावी, असा मुलाचा आग्रह आईने नाकारला. त्यानंतर रागाच्या भरात मुलाने आईचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह उसाच्या शेतात पुरला. काही वेळातच तो स्वतःही गळफास घेऊन मृत झाला. या दुहेरी मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत आरोपी मुलाचे नाव काकासाहेब वेणुनाथ जाधव (वय 48) असे आहे. त्याच्या कुटुंबाकडे वडिलोपार्जित 8 एकर शेती आहे. काही दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाले होते. चार बहिणींनंतर जन्मलेला तो एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. तीन महिन्यांपूर्वी मोठ्या मुलीचे लग्न करण्यात आले. या लग्नात झालेलं कर्ज फेडण्यासाठी वडिलोपार्जित थोडीशी शेती विकावी, असा सल्ला काकासाहेब यांनी त्यांच्या 70 वर्षीय आई समिंदराबाई वेणुनाथ जाधव यांना दिला. मात्र, पतीच्या निधनानंतर मी जमीन विकणार नाही, असे स्पष्ट सांगत आईने मुलाच्या प्रस्तावाला नकार दिला.

आईच्या नकारामुळे संतप्त झालेल्या काकासाहेब यांनी तिचा गळा आवळून खून केला. मृतदेह पोत्यात भरून उसाच्या शेतातील खड्ड्यात पुरला. यानंतर तो शेतापासून सुमारे आठ किलोमीटर दूर गेला आणि बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रेणापूर फाटा परिसरातील मोकळ्या जागेत एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पथकासह घटनास्थळी पोहोचले. चौकशीत मृत व्यक्ती काकासाहेब जाधव असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्या आई अन् पत्नी घरातून गायब असल्याचे लक्षात आले.

सदर घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांचा तपास सुरू झाला. आई आणि मुलांमध्ये शेतजमीन विकण्यावरून वाद असल्याची माहिती मिळाली. मुलगा काका साहेबाचा शोध सुरू झाला. मात्र काकासाहेबांचा तपास लागला नाही. रेणापूर शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत काकासाहेब जाधव यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, रेणापूर पोलिस पुढील तपास करत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती