सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 DIGITAL PUNE NEWS

धक्कादायक! अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलींवर पाच जणांकडून सामूहिक अत्याचार

डिजिटल पुणे    11-08-2025 14:52:51

मुंबई : एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांना मिळून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडल्याचं समजतंय. या मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करण्यात आले होते. हे व्हिडीओ दाखवून या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यात आले. या ब्लॅकमेलिंगला बळी पडल्यामुळे पाच जणांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्याचार करणारी पाचही मुले ही अल्पवयीन आहेत. या घटनेमुळे काळाचौकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.. या ब्लॅकमेलिंगला बळी पडल्यामुळे पाच जणांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्याचार करणारी पाचही मुले ही अल्पवयीन आहेत.

काळाचौकी पोलिसांनी मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मुलीवर अत्याचार सुरु होते. सततच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर मुलीने तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीना ताब्यात घेतले. ही पाच मुलं कोण आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर काळाचौकी परिसरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करतात, हे बघावे लागेल.


 Give Feedback



 जाहिराती