सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 DIGITAL PUNE NEWS

लोणावळ्यात पर्यटक महिलांची भररस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी; दारूच्या नशेत तरूणींचा रस्त्यावर धिंगाणा, वाहतूक पोलिसांना घाम फोडला

डिजिटल पुणे    21-08-2025 11:13:28

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये फिरायला व वाढदिवस साजरा करायला आल्यानंतर एका ग्रुपमधील काही महिलांमध्ये भांडणे झाली. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा वाहतूक शाखेच्या पोलीस चौकी समोरच ही भांडणे चालू होती यामुळे अक्षरशा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पर्यटनासाठी आलेल्या महिलांच्या ग्रुपमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान वाद झाला आणि तो भररस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारीत बदलला. महिलांनी एकमेकींना शिवीगाळ, केस ओढणे आणि मारहाण केली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नशेत असलेल्या या महिला पोलिसांचेही ऐकत नव्हत्या व "पोलीस आमच्या खिशात आहेत" असा आरडाओरडा करत होत्या. तासभर चाललेल्या गोंधळानंतर महिला पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले आणि कायदेशीर कारवाई सुरू केली

अश्लील शिवीगाळ व एकमेकाला या महिला मारहाण करत होत्या. त्याच्या सोबत असलेल्या पुरुषांना देखील शिवीगाळ व मारहाण त्या करत होत्या. सुमारे तासभर लोणावळ्यातील मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या समोरच हा राडा सुरू होता. महिला असल्यामुळे पुरुष पोलीस देखील यामध्ये फारसे हस्तक्षेप करत नव्हते अखेर लोणावळा शहर पोलीस स्टेशन मधून महिला पोलिसांना बोलवण्यात आले व त्यानंतर या सर्व महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मिळालेल्या माहितीनुसार सदरचा महिला व पुरुष ग्रुप हा पुण्यातील निगडी येथील होता. प्रत्यक्ष दर्शीच्या सांगण्यानुसार त्या नशेत होत्या. त्या सर्व एकाच ग्रुप मध्ये होत्या व त्यांच्यात अचानक भांडणे झाली. सुरुवातीला शिवीगाळ सुरू झाली व नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. हा सर्व प्रकार मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मुख्य चौकात व वाहतूक पोलीस चौकी समोर सुरू होता. पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस आमच्या खिशात आहेत असे म्हणत त्या मोठ मोठ्याने आरडाओरडा करत होत्या. पोलिसांचे देखील त्या ऐकत नव्हत्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता.


 Give Feedback



 जाहिराती