सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 DIGITAL PUNE NEWS

क्रीडा दिनानिमित राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव

डिजिटल पुणे    21-08-2025 15:44:48

मुंबई : क्रीडा दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात राज्यभर विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी कार्यप्रणाली तयार करण्यात यावी. त्यासाठीचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून त्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त शितल तेली, उपसचिव सुनील पांढरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील क्रीडा अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, केंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाच्या धर्तीवर नवे क्रीडा धोरण तयार करण्यात यावे. तसेच राज्यातील खेळाडूंच्या अपेक्षेप्रमाणे बदल करावे. क्रीडा महोत्सवात जिल्हा तसे तालुकास्तरावर विविध क्रीडा कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करावे. शाळा महाविद्यालय विद्यापीठांना तसेच जिल्ह्यातील क्रीडापटूंना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनाप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना अभिवादन, फिट इंडिया शपथ आणि ६० मिनिटे संघ खेळ व विरंगुळ्याचे खेळ आयोजित करावे.

३० ऑगस्ट रोजी स्थानिक/आदिवासी खेळ, इनडोअर स्पोर्ट्स, शाळा/महाविद्यालय स्तरावरील क्रीडा, वादविवाद, फिटनेस व्याख्याने, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. ३१ ऑगस्ट रोजी संडेज ऑन सायकल Sundays on Cycle या उपक्रमात देशभरातील नागरिकांचा सहभाग करून उपक्रम राबवावा.

या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात दोर खेचणे (Tug of war), ५० मी. शर्यत, रिले रेस, मॅरेथॉन, चमच्यातील गोळी शर्यत, गोणपाट शर्यत, योग, क्रिकेट, सायकलिंग, पिट्ठू सारखे स्थानिक खेळ, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, दोरीवर उड्या मारणे, बुद्धिबळ, ऑलिंपिक मूल्य शिक्षण कार्यक्रम  तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३०० मी. स्पीड वॉक, १ किमी वॉक, योग, श्वसनाचे व्यायाम, सांध्यांचे व्यायाम, स्ट्रेचिंग चॅलेंज, सायकलिंग या क्रीडा प्रकाराचा सहभाग करावा.


 Give Feedback



 जाहिराती