उरण : राजयोगिनी प्रकाशमणी दादीजींच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तसेच विश्वबंधुत्व दिनाच्या पावन प्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, समाजसेवा विभाग – पनवेल व रोटरी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी हुतात्मा स्मारक उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथे भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आमदार प्रशांत ठाकूर पनवेल, सुनील झुनझारराव, अध्यक्ष-भाजपा पनवेल शहरनगरसेवक, प्रीतम म्हात्रे अध्यक्ष – जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था,ऍड. श्रीमती शुभांगी झेमसे, डॉ. गुने (गुने हॉस्पिटल), डॉ. कुनाल माखिजा (पटेल हॉस्पिटल), डॉ. शुभदा नील (नील हॉस्पिटल), डॉ. अभिषेक सिंह (रोटरी ब्लड बँक) या मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली
.तसेचआमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या विचारातून एक मोलाचा संदेश दिला. व ब्रम्हाकुमारीज संस्थेचे व आयोजकाचे खूप कौतुक केले व रक्तदान केलेल्या व्यक्तीचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले व रक्तदान याविषयी जनजागृती केली.तसेच या शिबिरामध्ये एकूण ४५ रक्त युनिट्स संकलित करण्यात आले. समाजहितासाठी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच कार्यक्रमामध्ये रक्तदात्यांना ईश्वरीय सौगात, प्रमाणपत्र व प्रसाद देण्यात आला.
तसेच मोफत शुगर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. फळांचे प्रायोजक प्रीतम म्हात्रे यांनी केले.फळांचे वितरण राजयोगिनी तारा दीदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माईन्ड स्पा यामधून लोकांनी मनाची एकाग्रता व शांती या गोष्टीची अनुभूती घेतली.तसेच रक्तदान करा – जीवन वाचवा, योगध्यान करा – जीवन घडवा हा संदेश या शिबिरातून यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आला.