उरण : दिनांक ०८/०८/२०२५ रोजी दुपारी ०१:०० वाजता ते सायंकाळी ०४:०० वा. चे दरम्यान फिर्यादी राजु गुरूनाथ झुगरे वय ४४ वर्षे, रा. दादरपाडा, ता. उरण, जि. रायगड हे त्यांचे घरी नसताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचे कुलूप डुप्लीकेट चावीने उघडून घरामधील बेडरूमचे वॉर्डरूममध्ये ठेवलेले १३,७१,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करून नेले म्हणून फिर्यादी यांनी उरण पोलीस ठाणेत दिलेल्या तक्रारीवरून गु, रजि. नं. २१३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३), ३(५) अन्वये दिनांक ११/०८/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त नवी मुंबई, पोलीस सह आयुक्त,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ बेलापुर, सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग नवी मुंबई यांनी नमुद गुन्हा गंभीर असल्याने गुन्हयातील चोरास पकडून गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यासाठी सुचना व मार्गदर्शन केले होते.त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरिक्षक संजय राठोड, पोहवा /९६७ रूपेश पाटील, पोहवा /१७४४ शशिकांत घरत, पोहवा /१९८७ उदय भगत, पोहवा /१९५० गणेश शिंपी, पोना/२७९१ मेघनाथ पाटील, पोना / ३०७८ गंगाराम कचरे असे पथक तयार केले. सदर पथकाने तांत्रिक व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे १) नवनीत मधुकर नाईक वय ४५ वर्षे २) स्मिता नवनीत नाईक वय ४१ वर्षे, सध्या रा. रूम नं. १०६ बिल्डीग नं. ०३ सृष्टी अपार्टमेन्ट, उमरोली, ता. जि. पालघर मुळ रा. ०२ विजय निवास, रेडीज चाळ, टेंभीपाडा रोड, शिवाजी नगर, भांडुप (पश्चिम) मुंबई यांना उमरोळी, पालघर, जि. पालघर येथुन ताब्यात घेतले. नमुद आरोपींकडे सखोल तपास केला असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपीत यांना नमुद गुन्हयात दिनांक १५/०८/२०२५ रोजी अटक करून त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करून त्यांचेकडून गुन्हयातील चोरी केलेल्या मालमत्तेपैकी १४,५४,९२८/- रूपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागिने व इतर वस्तू हस्तगत करण्यात आले आहेत.
याव्यतिरीक्त वरील अटक आरोपीनी नवी मुंबई, रायगड, कोल्हापुर या जिल्हयात केलेले गुन्हे उघडकीस आणले आहेत ते खालीलप्रमाणे
१) तळोजा पोलीस ठाणे, नवी मुंबई गुन्हा रजि.क. १३९/२०२५ भान्यास कलम ३०५
२) खालापुर पोलीस ठाणे, रायगड गुन्हा रजि.क.५१९/२०२४ भान्यास कलम ३०५
३) शहापुर पोलीस ठाणे, कोल्हापूर गुन्हा रजि.क. ३१/२०२५ भान्यास कलम ३३१ (३),३०५
याशिवाय आरोपींचा पुर्व पुर्व इतिहास इति पाहता त्यांचेविरूध्द विविध जिल्हयात एकूण २२ गुन्हे दाखल असून त्यामध्ये त्यांनी शिक्षा भोगली आहे.सदरची कामगिरी अमित काळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ बेलापुर, किशोर गायके सहा. पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांचे मार्गदर्शनाखाली हनिफ मुलाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक , राहूल काटवाणी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उप निरिक्षक संजय राठोड, पोहवा /९६७ रूपेश पाटील, पोहवा /१७४४ शशिकांत घरत, पोहवा /१९८७ उदय भगत, पोहवा /१९५० गणेश शिंपी, पोना/२७९१ मेघनाथ पाटील, पोना / ३०७८ गंगाराम कचरे यांनी अथक प्रयत्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.अशी माहिती हनिफ मुलाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे नवी मुंबई यांनी दिली आहे.