सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 DIGITAL PUNE NEWS

नांदेड हादरलं ! लग्नानंतरही मुलीचं अफेयर.. पित्याने लेकीसह प्रियकराला संपवलं; हात- पाय बांधून विहिरीत फेकलं

डिजिटल पुणे    26-08-2025 12:35:56

नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराची पित्याने हत्या केल्याची भयंकर घटना नांदेडच्या उमरी तालुक्यात घडली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हादरवुन टाकणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले.

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी संजीवनी सुरने ही उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथे राहणारी होती. एक वर्षापूर्वी तिचा विवाह गोळेगाव येथील सुधाकर कमळे याच्यासोबत झाला होता. तिच्या वडिलांनी मोठ्या धुमधडाक्यात तिचे लग्न लावून दिले होते. मात्र संजीवनीचे विवाहापूर्वी गावातीलच एका तरुणासोबत संबंध होते. लग्नानंतरही त्यांच्यामध्ये फोनवरुन बोलणे, भेटणे सुरु होते. 

घटनेच्या दिवशी सासरची मंडळी बाहेर गेल्यानंतर संजीवनीने आपल्या प्रियकराला बोलावून घेतले. मात्र अचानक तिच्या सासरची मंडळी घरी आल्याने दोघेही रंगेहात सापडले.  मुलगी तिचा सासरी तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली तेव्हा सासरच्या मंडळींनी मुलीच्या वडीलांना बोलावून घेतले. अवैध संबंधामुळे आपल्या मुलीचा संसार मोडतोय हे पित्याच्या लक्षात आले.

नांदेडच्या उमरी तालुक्यातील गोळेगावमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली. विवाहीत मुलीसह तिच्या प्रियकराला मुलीच्या वडिलांनी विहिरीत फेकले. विहिरीतून मुलीचा मृतदेह मिळाला, तीच्या प्रियकराचा शोध सूरू आहे. 19 वर्षीय मुलीचा विवाह एक वर्षापूर्वी झाला होता. मात्र तिचे गावातील युवका सोबत प्रेम संबंध होते. मुलीच्या सासरी युवक तिला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा त्या दोघांना मुलीच्या सासरच्यांनी एकत्र पकडले. मग मुलीच्या वडिलांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला दोरीने बांधून विहिरीत फेकूले. यात दोघांचाही मृत्यू झाला.

नांदेडमध्ये जन्मदात्या वडिलांनी स्वत:च्या मुलीला आणि तिच्या प्रियकराची हत्या केली.मृत संजिवनी कमळेचं वर्षभरापूर्वी थाटामाटात लग्न झालं होतं.लग्नापूर्वी संजिवनीचे लखन भंडारे नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते.लग्नानंतर ही दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरु होते. सोमवारी सासरचे मंडळी बाहेर गेल्याने संजीवनी हिने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं. त्यावेळी सासरची मंडळी देखील अचानक घरी पोहोचली. सासरच्या मंडळींनी सगळा प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी मुलीच्या प्रियकराला भेटायला बोलावलं.आणि दोघांना मारहाण करुन त्यांचा मृतदेह करकाळा शिवारातील विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत फेकून दिला.हत्येनंतर आरोपी वडील मारोती सुरणे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी घडलेल्या घटनेची कबुली दिली. अखेर मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढलं.आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.या प्रकरणी उमरी पोलिस अधिक तपास करत आहेत. या भयंकर घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. 


 Give Feedback



 जाहिराती