पुणे : इंडियन रेड क्रॉस सोसायटी हरियाणा राज्य यांच्यावतीने अंतर राज्य युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजित २२ ऑगस्ट २०२५ ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत कुरुक्षेत्र येथे करण्यात आलेले आहे याचा उद्देश आपल्याला माहित आहे की आपला देश इतका वैविध्यपूर्ण आहे की दर ५० किमी नंतर भाषा आणि संस्कृती बदलते. त्यामुळे, देशातील राज्यांमध्ये मैत्री आणि परस्पर समंजस पणाला चालना देण्यासाठी, इंडियन रेड क्रॉस सोसायटी मार्फत देशामध्ये युवा आदान प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत कार्यक्रमाचा उद्देश विचार आणि ज्ञानाच्या देवाण-घेवाणीला चालना देणे, विविध राज्यातील तरुणांमध्ये सखोल समज वाढवणे आणि सुव्यवस्थित उपक्रम आणि परस्पर संवादाद्वारे अनुभव आणि कौशल्ये सामायिक करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे हा आहे. विविध राज्यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी अवलंबलेल्या यशस्वी पद्धतींची देवाणघेवाण सुलभ करणे तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
हे सहभागी तरुण आणि इतर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये अर्थपूर्ण बंध आणि मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत, तसेच विविध राज्यातील परंपरा, चालीरीती आणि सांस्कृतिक वारसा समजून घेण्याची आणि प्रशंसा करण्याची संधी देखील प्रदान केली जाणार आहे. या युवा प्रशिक्षण शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्यांमधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यांचा संघ कुरुक्षेत्र येथे सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली आहे. प्राचार्य डॉ.शर्मिला चौधरी व इंडियन रेड क्रॉस सोसायटी युथ रेड क्रॉस चेअरमन प्राचार्य डॉ. संजय खरात, सचिव उषा साळवी, प्रा.आर.व्ही कुलकर्णी, फील्ड ऑफीसर भारती कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय युथ रेड क्रॉस युनिक समन्वयक डॉ. अशोक शेळके महाराष्ट्र राज्याच्या संघाचे संघनायक म्हणून सहभागी झाले आहेत.