सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • नांदेड जिल्ह्यात पावसाने उडवली दानादान; नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस.
  • परभणीच्या पालम तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली; 9 गावांचा संपर्क तुटला
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • छत्रपती शिवाजी टर्मिनन्सवरच्या पोरांनी शांत राहावे, जरांगे पाटील यांचं आवाहन
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
  • सरकारकडून खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश, कोणत्याच सुविधा नाही; रोहित पवारांचा गंभीर आरोप
 व्यक्ती विशेष

जरांगे पाटील अखेर मुंबई आझाद मैदानात दाखल; मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या आंदोलकांना सूचना

डिजिटल पुणे    29-08-2025 12:38:25

मुंबई : मराठा समाजासाठी अखेर तो दिवस उगवला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील अखेर आज मुंबईत आझाद मैदानात दाखल झाले आहेत. तेथे ते उपोषण करणार आहेत. त्यामुळे मुंबईत मराठा वादळ पाहायला मिळत आहे. राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आझात मैदान तुडुंब भरलं आहे. दरम्यान, यापूर्वीही जरांगेंनी मुंबईला मोर्चा वळवला होता. पण वाशी येथेच त्यांची मनधरणी करून परत पाठवण्यात आले होते. मात्र ते मुंबईवर धडकले आहेत.

सरकारला आपल्याला सहकार्य करायचे नव्हते म्हणून मराठ्यांना मुंबईत यावं लागलं असं म्हणतं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप केला. आपल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून हटणार नाही असे ते म्हणाले.  सरकारने बेमुदत उपोषण करू द्यावं, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका असंही जरांगे यांनी यावेळी म्हटलं. 

"आपलं ठरलं होतं की मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण आझाद मैदानावरच करायचं. त्यानुसार आज आपण उपोषणाला सुरुवात केली आहे. आता तुमची जबाबदारी काय आहे? सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं, म्हणून मराठा समाजाने ठरवलं होतं की मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. त्यानुसार आपण मुंबई जामही केली. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने आपल्याला सहकार्य केलंय, परवानगी दिली आहे. त्याबद्दल आपण काल-परवा मोठ्या मनाने सरकारचं कौतुकही केलं. आता आपल्याला उपोषणाला परवानगी मिळाली आहे, आता सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि शांततेत राहायचं," असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजबांधवांना केलं आहे.

जरांगे पाटलांच्या आंदोलकांना कोणत्या सूचना?

- कोणीही रस्त्यावर किंवा कुठेही गोंधळ घालायचा नाही.

 कोणीही दगडफेक, जाळपोळ करायची नाही.

- मुंबई आपण जाम केली, आता दोन तासांत मुंबईचे रस्ते मोकळे करा.

- सर्वांनी पोलिसांना सहकार्य करा.

- सरकारने जे मैदान दिलंय, तिथंच तुम्ही झोपा. काहीजण वाशी इथं जाऊन झोपा.

- अधिकृत पार्किंगची व्यवस्था जिथं करण्यात आलीय तिथंच गाड्या लावा. हायवेवर गाड्या उभ्या करू नका.

- मुंबईकरांना त्रास झाला नाही, पाहिजे ही जबाबदारी आपली आहे.

- जे आम्हाला मुंबईत सोडण्यासाठी आले होते, त्यांनी परत माघारी गेलं तरी चालेल.

- आपल्याला आरक्षण पाहिजे आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा, इतर कोणतीही गोष्ट करायची नाही.

- आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही.


 Give Feedback



 जाहिराती