उरण : समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन २०१७ मध्ये चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड हे एक छोटेसे रोपटे लावण्यात आले होते. २२/८/२०१७ साली संस्थेची स्थापना झाली.आता या रोपट्याला ८ वर्ष पूर्ण होऊन ९ व्या वर्षात पदार्पण करत आहे.या संस्थेने आज पर्यंत अनेक समाज उपयोगी अनेक उपक्रम रबवले आहेत. त्या मध्ये प्रामुख्याने कोविड काळात आदिवासी बांधवाना व गरीब गरजूना अन्नधान्य तसेच जीवन आवश्यक वस्तू वाटप, रक्तदान शिबीर, दिव्यांग विध्यार्थीना शालेय साहित्य वस्तूचे वाटप,नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन जीवनावश्यक वस्तूचे वाटप, विविध आजारग्रस्त पाल्याना आर्थिक मदत,
वृद्धाश्रमात अन्नधान्य व जीवनाशक्य वास्तूचे वाटप, रायगड जिल्हातील विविध कलागुण असणाऱ्या कलाकारांचा विशेष सम्मान, कलाकारांना पुरस्कार देऊन गुणगौरव, आदिवासी व गोर गरिबांना शालेय शिक्षणासाठी वस्तू स्वरूपात व आर्थिक स्वरूपात मदत, वृक्षरोपण, परिसरात स्वच्छता आभियान, रायगड मध्ये मातृ पितृ छत्र हरवलेल्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, आदिवासी बंधू भगिनी सोबत दर वर्षी दिवाळी सामान देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी, दर वर्षी नवरात्री ला विविध क्षेत्रातील नवं दुर्गा महिलांचे सम्मान हे कार्य आजही अविरतपणे सुरूच आहेत.
ही संस्था सामर्थ पणे विविध उपक्रम राबवत आहे.दर वर्षी ही संस्था नवीन कार्यकारणी जाहीर करते.त्याच प्रमाणे या वर्षीही चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड या संस्थेची २०२५ /२०२६ ची कार्यकारणी लोकशाही पद्धतीने निवडण्यात आली.ही निवड दरवर्षी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली होते.८ वे वर्ष पूर्ण करून ९ व्या वर्षात सदर संस्थेने यशस्वीपणे पदार्पण केल्याने विविध सामाजिक संस्था संघटनानी, सामाजिक कार्यकर्ते यांनी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.