सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ओबीसींसाठीही उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य
  • मोठी बातमी! ओबीसीसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती गठीत होणार; शासनाकडून आजच GR निघणार
  • : खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू
  • पुण्यातील मुळशी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान एका युवकाचा बुडून मृत्यू
  • जीआरमध्ये फसवणूक झाल्यास राज्यात एकही मंत्री फिरु देणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा इशारा
 जिल्हा

द्रोणागिरी नोड वसाहतीतील नागरिक विविध समस्यांनी ग्रस्त ;समस्या सोडविण्याचे प्रशासनाचे आश्वासन, मात्र कृती शून्य

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    02-09-2025 14:15:05

उरण :  उरण तालुक्यात द्रोणागिरी नोड हे नव्याने विकसित झाला असून सिडको प्रशासनातर्फे हे द्रोणागिरी नोड (वसाहत )वसविली आहे. नव्याने  वसाहतीकरण व शहरीकरण होत असल्याने व दळणावळणाच्या दृष्टीने द्रोणागिरी हे स्थान तालुक्याच्या मधोमध, केंद्रस्थानी असल्यामुळे उरण तालुक्यात राहणारे व तालुक्याच्या बाहेरील अनेक नागरिकांनी येथे मोठ्या प्रमाणात घरे विकत घेतली आहेत. आलिशान व सुंदर दिसण्या टोलेजंग दिसणाऱ्या इमारती मध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेत विकत घेतली आहेत. काही जणांनी इन्व्हेस्ट म्हणून घेतली आहेत तर काही नागरिकांना राहायला घरच नसल्याने त्यांनी राहण्यासाठी येथे घरे विकत घेतली आहेत.

येथील बिल्डरांनी,विकसकांनी सर्व सेवा सुविधा उपलब्ध असल्याचे सांगून ग्राहकांना घरे मोठ्या प्रमाणात विकली आहेत.सिडको प्रशासनानेही द्रोणागिरी नोड‌मध्ये सर्व सेवा सुविधा पुरविण्याचे आश्वासन नागरिकांना,जनतेला दिले होते. मात्र प्रत्यक्ष द्रोणागिरी वसाहत बसवून आज अनेक वर्षे झाले तरी देखील आजही द्रोणागिरी परिसरात पाणी वीज रस्ते,हॉस्पीटल, स्मशानभूमी, पोलीस स्टेशन, दळणावळणा साधने, शाळा कॉलेज, सांडपाण्याची सोय,खेळासाठी मैदान, विविध सण उत्सव साजरे करण्यासाठी मोठे व सुसज्ज असे सभागृह आदी कोणतेही सेवा सुविधा पुरविले नसल्याने द्रोणागिरी नोड परिसरात विविध इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सिडको प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे द्रोणागिरी नोड मध्ये व आजूबाजूच्या परिसरात अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देखील नाहीत तरी बिल्डर लॉबी कडुन मोठया प्रमाणात इमारती बांधण्याचे काम सुरूच आहे. द्रोणागिरी परीसरात अनेक अवैध कामे,बेकायदेशीर पार्किंग , भर रस्त्यावर पानटपरी हातगाड्यांचे स्टॉलचे अतिक्रमण झाले आहे. मात्र या गंभीर बाबी कडेही सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष चालूच आहे.यामुळे या परिसरात चोऱ्यांचे , अपघातांचे व विविध गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना मूलभूत सेवा सुविधाच मिळत न‌सल्याने सिडकोच्या कार्य पद्धतीवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.द्रोणागिरी नोड व द्रोणागिरी नोडच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी विविध समस्येच्या संदर्भात सिडको प्रशासनाकडे अनेक वेळा वारंवार पत्रव्यवहार करू‌न देखील,विविध समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी करून देखील सिडको प्रशासनाने, सिडकोच्या अधिका-यांनी नागरिकांच्या समस्या कडे नेहमीच जाणून बुजून दुर्लक्ष केलेले आहे.नागरिकांना कोणत्याच सेवा सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत द्रोणागिरी नोड नागरिकांचा जीव घेण्यासाठी वसविली आहे का असा प्रति सवाल प्रशासनाला केला आहे.

विविध समस्या असल्याने द्रोणागिरी नोड मध्ये घरे विकत घेतलेल्या नागरिकांवर आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घरे विकत घेत‌ले असल्याने ते आता अडकले आहेत.मोठ्या प्रमाणात फसले आहेत. सिडकोच्या व बिल्डरांच्या विविध जाहिराती व विविध आमिषाना बळी पडत आहेत.घर लोनवर विकत घेतल्याने व बिल्डर सोबत कुठे लाखोंचा तर कुठे कोट्यावधीचा व्यवहार केल्याने नागरिक इतर दुसऱ्या विकाणी जाऊ शकत नाही किंवा दुस-या ठिकाणी घरे विकत घेऊ शकत नाही. घर विकत घेण्यासाठी नागरिकांनी द्रोणागिरी नोड व द्रोणागिरी नोड परिसरात लाखो करोडो रुपये गुंतविले आहेत. त्यामूळे नागरिक पूर्णपणे फसले आहेत. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था द्रोणागिरी नोडमधील इमारतीमध्ये राहणा-या नागरिकांची झाली आहे.या समस्या कधी सुटतील सा विचारातच नागरिकांचे वेळ व श्रम वाया जात आहेत. विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना आता डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.

द्रोणागिरी नोड मध्ये विशेषत: सेक्टर ५२ ते से ५५ मध्ये जवळपास प्रत्येक इमारती समोर ड्रेनेज लाइन चोक अप होऊन गटारीचे पाणी प्रत्येक बिल्डिंग समोरील रस्त्यावर वाहत आहे. सिवेज ट्रीटमेंट प्लांट नाही तोपर्यंत प्रत्येक सोसायटीने आपल्या बिल्डिंग मधील सीवेज चेंबर स्वतः साफ करावे म्हणजे रस्त्यावर गटारी तुंबणार नाही असे सिडकोने सांगून येथील समस्यांच्या निराकरणाचा खर्च नागरिकांच्या माथी मारला आहे.इतर सेक्टर ला सिवेज ट्रीटमेंट प्लांट असून तेथे अशी समस्या नाही मग सिडकोचा सेक्टर ५२ ते से ५५ मधील गटारी तुंबण्याबाबत हा  हात झटकण्याचा प्रकारच चालू आहे,तोही अनेक वर्षापासून अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.


 Give Feedback



 जाहिराती