सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ओबीसींसाठीही उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य
  • मोठी बातमी! ओबीसीसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती गठीत होणार; शासनाकडून आजच GR निघणार
  • : खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू
  • पुण्यातील मुळशी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान एका युवकाचा बुडून मृत्यू
  • जीआरमध्ये फसवणूक झाल्यास राज्यात एकही मंत्री फिरु देणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा इशारा
 जिल्हा

खोपटे येथील शिवकृपा गौरी मंडळाच्या माध्यमातून यंदा रामसेतूचा देखावा.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    02-09-2025 18:46:46

उरण :  उरण तालुक्यातील खोपटे गावातील शिवगौरा उत्सव  प्रसिद्ध आहे. दरवर्षी या उत्सवाची सर्व भाविक भक्त मोठया ऊत्साहाने वाट पाहत असतात.उरणच्या खोपटा गावातील पाटील पाड्यात शिवकृपा गौरा मंडळाच्या माध्यमातून साजरा होणारा शिवागौरा उत्सव यावर्षी ८४ व्या वर्षीचा देखावा म्हणून वानर सेनेने प्रभू श्री रामाना श्रीलंकेत जान्यासाठी जो समुद्रातून रामसेतू तयार केला होता तो रामसेतू बांधतांना साक्षात समुद्र देव प्रसन्न झाल्याचा प्रसंग साकारण्यात आला आहे. समुद्र देवाला प्रसन्न करून रामसेतू बांधण्यात आला होता अशी आख्यायिका आहे. त्यावर आधारीत रामसेतू बांधण्यापुर्वी प्रभू श्री राम हे समुद्र देवाला प्रसन्न करतानाचा देखावा साकारला गेला आहे.

या देखाव्यात प्रभू श्री राम, बंधू लक्ष्मण,समुद्र देव आणि हनुमंत राया अशा चार मुर्त्या साकारल्या गेल्यां आहेत. या सर्व मुर्त्या खोपटा गावातील म्हात्रे पाड्यातील भाया पेंटर यांच्या कारखान्यात तयार करण्यात आल्या आहेत. तर मुख्य पूजनाची मुर्ती असलेली शिवमूर्ती ही श्री गणेश आणि पार्वती मातेसह अतिशय हुबेहूब साकारण्यात आली आहे. यावर्षी गौरा मंडळाचे ८४ वे वर्ष असल्याने पहिल्या दिवशी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता शिवागौरा आगमन झाले आहे. ११ वाजता अभिषेक पूजन कार्यक्रम झाला आहे.दुपारी १ वाजता पारायणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला आहे. रात्री ११ वाजता होणाऱ्या शिवगौरा जागरण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये हजारो लोकं गौरा मंडळाच्या अंगणातं जमा झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी पुरूषांचे भवर नृत्य सादर करून पुरुष भक्तांच्या अंगात गौरा संचारल्याचे पाहायला मिळाले.

हा सोहळा अनुभवण्यासाठी अनेकजण अगदी लांबलाबून आल्याचे पहायला मिळाले. २ तारखेला सकाळी ७ वाजता आरती दिवसभर दर्शन आणि रात्री ८ वाजता जॉनी रावत यांचा ऑर्केस्ट्रा सुपर हिट हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. ज्या मध्ये गीत संगीत कॉमेडी आणि लावणी आदी कार्यक्रमांचा आस्वाद नागरिकांनी मोठया प्रमाणात घेतला आहे. बुधवारी ३ सप्टेंबर रोजी दिवसभरात भक्तिमय कार्यक्रमांसोबतच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. रात्री ९ वाजता ह. भ. प. अलकाताई सतीश वाल्हेकर नसरापूर पुणे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आस्वाद घेता येणार आहे. या शिवगौऱ्याचे मुख्य आकर्षण असलेला शिवगौरा विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने यावर्षी देखील आपली जुनीच परंपरा राखत शक्ती तुऱ्याचे जंगी नाचांचे सामने आयोजित करण्यात आले आहेत.

शिवगौरा या ठिकाणी घुंगरू वाजले पाहिजेत या धार्मिक हेतूच्या निमित्ताने पहिली बारी ही गौरा मंडळाच्या मंडपात साजरी केली जाते. त्यानंतर सुरू होते ती शिवगौऱ्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक ! या मिरवणुकीच्या निमित्ताने अगदी सुमारे वीस ते पंचवीस हजार भाविक या ठिकाणी जमत असतात. विविध बेंजो पथक या कार्यक्रमात सामील झाल्याचे पहायला मिळतात आणि या तालावर लहान थोर अगदी बेधुंद होऊन नाचत असल्याचे पहायला मिळते.साधारण सात वाजताच्या सुमारास मोठ्या देवळात सार्वजनिक आरती घेऊन शिवगौरा विसर्जन केला जातो.अशी माहिती शिवगौरा उत्सवचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी दिली.यंदा गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी विसर्जन आहे.वर्षभर ज्या सोहळ्यासाठी नागरिक आणि भक्त गण आगदी आतुरतेने वाट पाहत असतात त्या शिवगौरा उत्सव सोहळ्यात भक्त गण आणि गावकरी अक्षरशः तल्लीन झाल्याचे पहावयास मिळते.


 Give Feedback



 जाहिराती