सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पुण्याची मिरवणूक सुरू! मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...
  • वनराज आंदेकरच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा बळी
  • पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार, संशयितांवर ठेवणार करडी नजर , शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत
  • मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही; संजय राऊतांचा घणाघात
 शहर

पुण्यातील मुळशी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान एका युवकाचा बुडून मृत्यू

डिजिटल पुणे    03-09-2025 15:29:17

पुणे : पुण्यातील मुळशी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लक्ष्मण चव्हाण असे बुडालेल्या युवकाचे नाव असून, तो लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील रहिवासी आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र आज सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आला आहे. तरीही, युवकाचा अद्याप शोध लागलेला नाही. ही दुर्घटना मुळा नदीच्या किनाऱ्यावर घडली, जिथे लक्ष्मण आपल्या मित्रांसोबत गणेश विसर्जनासाठी गेला होता.

लक्ष्मण चव्हाण सध्या पिरंगुट येथे वास्तव्यास असून, एका खासगी रुग्णालयात काम करतो. गणपती विसर्जनासाठी तो आपल्या मित्रांसह मुळा नदीच्या किनाऱ्यावर गेला होता. विसर्जनादरम्यान पाण्यात उतरल्यानंतर, अचानक तो पाण्यात खोल गेले आणि वाहून गेला. त्याच्या मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि ग्रामीण पोलीस यांच्याद्वारे घटनास्थळी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र संध्याकाळी अंधार आणि जोरदार प्रवाहामुळे शोध थांबवावा लागला. बुधवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

पुण्यात मंगळवारी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान उत्साहाचे वातावरण असले तरी काही ठिकाणी काळजाला भिडणाऱ्या घटना घडल्या. लक्ष्मण चव्हाण यानेही आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नदीच्या पात्रात प्रवेश केला, पण त्यातून तो परत बाहेर आला नाही. सध्या शोधकार्य सुरूच असून प्रशासनाकडून नागरिकांना विसर्जनावेळी काळजी घेण्याचे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती