मुंबई : कर्करोगावरील उपचारामध्ये रेडिएशन उपचार पद्धतीत उत्पादने पुरविणारी जर्मनी येथील बिबिग जीएमबीएच वैद्यकीय समुहाच्या शिष्टमंडळाने आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी कर्करोगावरील उपचारांमध्ये रेडिएशन उपचार पद्धतीचा प्रभावीपणा, या उपचार पद्धतीसाठी लागणारी उत्पादने, यामधील पुरवठासाखळी आदींविषयी चर्चा केली. राज्यातील कर्करोगाच्या उपचार व्यवस्थेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला माहिती दिली.समुहाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज चान, डान्जा हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मल्ला, संचालक श्रीकांत मल्ला, महाव्यवस्थापक सुजित कुमार उपस्थित होते.