सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अन्यायाविरूध्द झुंज देणारे शूर स्वातंत्र्य योध्दे उमाजी नाईक यांची आज जयंती
  • आज चंद्रग्रहण
 जिल्हा

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला; ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल

डिजिटल पुणे    04-09-2025 16:25:22

मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी यापूर्वी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार दि. ८ सप्टेंबरला असणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.

राज्यात बंधुता आणि एकता टिकावी या हेतूने मुस्लीम समाजाने ईद-ए-मिलाद निमित्त काढला जाणारा जुलूस कार्यक्रम ६ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील ५ सप्टेंबर रोजी जाहीर झालेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती ८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

शनिवार दि ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. राज्यात बंधुता आणि हिंदू – मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजीची सुट्टी आता सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती