सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अन्यायाविरूध्द झुंज देणारे शूर स्वातंत्र्य योध्दे उमाजी नाईक यांची आज जयंती
  • आज चंद्रग्रहण
 राज्य

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात ‘श्री गणेशा’चे दर्शन

डिजिटल पुणे    04-09-2025 17:30:28

नवी दिल्ली : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे श्री गणेशाचे दर्शन घेतले. निवास आयुक्त आर. विमला यांनी त्यांचे स्वयं सहायता गटांनी तयार केलेल्या पारंपरिक शालीने स्वागत केले. महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या, “गेल्या २७-२८ वर्षांपासून महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव साजरा होत आहे. हा उत्सव आपली संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा दर्शवतो. दिल्लीत गणपतीचे दर्शन घेण्याचा  आनंद मिळाला. स्वयं सहायता गटांच्या स्टॉल्सना येथे उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे, ही अभिमानाची बाब आहे.”

बल्गेरियाचे भारतातील राजदूत निकोलाय यान्कोव यांनी घेतले ‘श्री गणेशा’चे दर्शन

बल्गेरियाचे भारतातील राजदूत निकोलाय यान्कोव यांनीही श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत शिष्टमंडळ उपस्थित होते. निवास आयुक्त आर. विमला यांनी त्यांचे स्वागत केले. राजदूतांनी स्वयं सहायता गटाच्या प्रदर्शनाला भेट देऊन हस्तकला वस्तूंची पाहणी केली आणि खरेदीही केली. “ हा भारतीय संस्कृतीचा अनोखा उत्सव आहे. हा उपक्रम स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देणारा आहे,” असे यान्कोव म्हणाले. ही भेट भारत-बल्गेरिया सांस्कृतिक संबंध दृढ करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी गायक नितीन सरकटे यांचा हिंदी-मराठी भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला. उपस्थितांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवाने देश-विदेशातील मान्यवरांचे लक्ष वेधले असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे.


 Give Feedback



 जाहिराती