सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अन्यायाविरूध्द झुंज देणारे शूर स्वातंत्र्य योध्दे उमाजी नाईक यांची आज जयंती
  • आज चंद्रग्रहण
 जिल्हा

पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर ! नाना पेठेत वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळ्या झाडून खून

Snehal    05-09-2025 22:47:08

पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर ! 

नाना पेठेत वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळ्या झाडून खून

पुण्यातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉरची घटना घडली. 

हल्लेखोरांनी तरुणावर तीन गोळ्या झाडल्या असून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गोळ्या झाडून खून झालेला तरुण म्हणजे गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गणेश कोमकर हा एक वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी होता.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती