सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सोशल मीडिया बंदीवरुन नेपाळमध्ये राडा, तरुणाई संसदेत घुसली, आतापर्यंत 5 आंदोलकांचा मृत्यू
  • मोठी बातमी: सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार
  • अन्यायाविरूध्द झुंज देणारे शूर स्वातंत्र्य योध्दे उमाजी नाईक यांची आज जयंती
  • आज चंद्रग्रहण
 शहर

परिस्थिती समोर ना हार मानली, ना संकटांना भीक घातली! पण उकळत्या पाण्याने केला घात; अश्विनीची 11 दिवसांची मृत्यूशी झुंज

डिजिटल पुणे    08-09-2025 11:29:48

पुणे : पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अश्विनीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील बाबुराव केदारी (वय ३०) हिच्यासोबत २८ ऑगस्ट रोजी मोठी दुर्घटना घडली. बाथरूममध्ये हिटरचा धक्का बसून उकळते पाणी अंगावर सांडले. या अपघातात अश्विनी तब्बल ८० टक्के भाजली होती. तत्काळ तिला पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान तिचे निधन झाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023 च्या पीएसआय परीक्षेत मुलींत राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारी (पाळू, पुणे) यांचे पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात निधन झाले. त्यांनी तब्बल 11 दिवस मृत्यूशी झुंज दिली. 28 ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यास करत असताना त्यांनी आंघोळीकरिता ठेवलेल्या पाण्यात हिटरमधून शॉक लागून गरम पाणी अंगावर पडले, यात त्या 80 टक्के भाजल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराचा खर्च देखील त्यांच्या सहकाऱ्यांनी उचलला होता. मात्र अखेर गणेश विसर्जनाच्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.


 Give Feedback



 जाहिराती