पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी,डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी,सुफी वारकरी विचार मंच,अवामी महाज सामाजिक संघटना आणि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांचा,पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि कार्यकर्ते,पोलीस आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.४० मंडळांच्या अध्यक्षांचा शाल,श्रीफळ,गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला आणि २० हजार पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या.अनंत चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता शतरंजीवाला जमात खाना चौक (लक्ष्मी रस्ता) येथे उभारलेल्या स्वागत कक्षात हा उपक्रम पार पडला.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार,एड.इफ्तेकार इनामदार,सुफी विचार मंचचे अध्यक्ष मशकूर शेख,सचिव उमर शरीफ शेख,मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद,संचालक अफझल खान,मुनव्वर शेख,'अवामी महाज' सामाजिक संघटनेचे सचिव वाहिद बियाबानी,मुश्ताक पटेल,रौफ शेख,असिफ शेख,वहाब मणियार,शब्बीर भाई हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन मशकूर शेख,उमर शरीफ शेख,मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद,वाहिद बियाबानी,साबीर शेख,बद्रुद्दिन शेख,सादिक लुकडे,फिरोज चांद शेख यांनी केले.