सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
  पर्यटन

जागतिक पर्यटन दिन पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन -सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांची माहिती

MSK    23-09-2021 19:35:48

जागतिक पर्यटन दिन पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन                                      -सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांची माहिती

 

  पुणे दि. 23 : पर्यटन संचालनालयाव्दारे जागतिक पर्यटन दिनानिमित्त पुणे विभागात पुणे, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्हयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची  माहिती  पर्यटन संचालनालयाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली.

 

  २७ सप्टेंबर २०२१ हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्था (UNWTO) या आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेदार दरवर्षी जागतिक पर्यटन दिनानिमित्त घोषवाक्य प्रसिध्द करण्यात येते. यावर्षी जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य Tourism for Inclusive Growth" (सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन) घोषित करण्यात आले आहे. 

पुणे शहर

- १. पुणे हेरीटेज वॉक पर्यटन संचालनालय विभागीय कार्यालय पुणे व टूरीझम फोरम ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारवाडा- लाल महाल प्रार्थना समाज मंदिर- महात्मा फुले मंडई या भागात हेरीटेज वॉक आयोजित केला आहे.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने २६ तारखेला ऑनलाईन बेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

तेलंग कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने २८ तारखेला वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 

सातारा

पर्यटन संचालनालय व टूर ऑपरेटर असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना कास पठार व वजराई धबधबा यांची एकदिवसीय सहल आयोजित करण्यात आली आहे. तसेच, TAAS Travel Association of Satara यामध्ये सातारा, कराड, पाचगणी व शिरवळ येथील हे सर्व टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स एकत्रितपणे जागतिक पर्यटन दिन साजरा करणार आहेत.

 

कोल्हापूर 

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. करवीर निवासिनी पुनः प्राणप्रतिष्ठापना दिन वर्धापन सोहळा, डेस्टिनेशन कोल्हापूर लोगो चे अनावरण, जिल्हा पर्यटन वेबसाईटचे अनावरण, जिल्हा पर्यटन नकाशाचे अनावरण, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, व्हिडिओग्राफ स्पर्धा यांचे अनावरण, कोल्हापूर उत्सवांचे वेळापत्रक प्रकाशन, पर्यटन विकासासंदर्भात ऑनलाईन व्याख्याने, बाईक रॅली, दुर्ग भ्रमंती, जंगल भ्रमंती, ग्राम भ्रमंती, जल पर्यटन, कृषी पर्यटन व साहस पर्यटनाचे कार्यक्रम, स्वच्छता अभियान, हेरिटेज समिती तर्फे व्हीडिओ प्रकाशन, हस्तकला प्रात्यक्षिक, ऑफ रोड रॅली. हेरिटेज चॉक आदी उपक्रम या दरम्यान राबविण्यात येणार आहेत.

 

सोलापूर

 जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सोमवारी (२७ सप्टेंबर) सकाळी ७.३० वाजता विजापूर रोड परिसरातील सिद्धेश्वर वनविहारात सोलापुरातील व्यापारी संघटनांच्या पदाधिका-यांसाठी नेचर वॉक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने पर्यटन संचनालयाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित केला आहे. सोलापूर वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या सिद्धेश्वर वनविहारात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. सोलापूर शहराजवळ असलेले सिद्धेश्वर वनविहार हे निसर्ग पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. पर्यटन दिनाच्या निमित्ताने सोलापुरातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकान्यांना सिद्धेश्वर बनविहाराची माहिती देऊन भटकंती घडविण्यात येणार आहे.

००००


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती