मुंबई : बॉलिवूडचा किंगखान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान एका सिनेमाच्या शूटिंगवेळी जखमी झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख खानला मल्टिपल मसल इंज्युरी झाल्यात. त्यामुळे उपचारांसाठी किंगखानला अमेरिकेला हलवण्यात आलंय. शाहरुख मुंबईतील गोल्डन टोबॅगो स्टुडिओमध्ये शूटिंग सुरु असताना जखमी झालाय. शाहरुखला गंभीर इजा झाली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकेला नेल्यात आलंय. त्यामुळे सिनेमाची शूटिंग दोन महिने पुढे ढकलण्यात आलीये. सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली सुरु असलेल्या सिनेमाचं शूटिंग आता दोन महिने पुढे ढकलण्यात आलंय.
शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी
प्रोडक्शनशी संबंधित एका जवळच्या सूत्राने माहिती दिली की, “शाहरुख खान यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, फक्त स्नायूंना ताण आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये स्टंट करताना त्यांना अनेकदा दुखापती झाल्या आहेत.” शाहरुखच्या टीमने खबरदारीचा उपाय म्हणून परदेशात उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांना उत्तम उपचार मिळू शकतील.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी शाहरुख खान यांना किमान एक महिन्याचा संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे 'किंग' चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे. फिल्म सिटी, गोल्डन टोबॅको आणि वायआरएफ स्टुडिओ यांसारख्या लोकेशन्स जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी बुक करण्यात आल्या होत्या, पण आता पुढील सूचनेपर्यंत त्या बुकिंग्स रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील शूटिंग सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 'किंग' हा सिनेमा सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला असून हा सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अनिल कपूर आणि सुहाना खान सारखे कलाकार झळकणार आहेत. यापूर्वी शाहरुख 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.