सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
  • खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
  • मुंबईकरांनो सावधान, पुढील तीन तास जपून, अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट
  • मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे, पाऊस अन् वाऱ्याचा वेग वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट
 DIGITAL PUNE NEWS

मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागीच मृत्यू

डिजिटल पुणे    09-09-2025 16:52:08

मुंबई : दक्षिण मुंबईतील वरळी सी-लिंकवर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला आहे.सागरी किनारा मार्ग आणि वरळी सी-लिंकच्या कनेक्टिंग पॉईंटजवळ हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, याठिकाणी काही पोलीस कर्मचारी व्हीआयपी बंदोबस्तासाठी तैनात होते. रस्त्यावरुन भरधाव वेगात जात असलेल्या एका कारने या पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले. या अपघातात एका पोलीस हवालदाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव दत्तात्रय कुंभार असे आहे. ते वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. गाडीच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने वोकहार्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी संबंधित कार चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कारवाई सुरु आहे.

मुंबईतील वरळी सी-लिंकवर मंगळवारी सकाळी एका भरधाव गाडीने पोलीस हवालदार दत्तात्रय कुंभार यांना उडवले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या अपघातात एक महिला पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून, प्राथमिक माहितीनुसार व्हीआयपी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना भरधाव गाडीने उडवल्याचे सांगण्यात येत आहे


 Give Feedback



 जाहिराती