सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; देवेंद्र फडणवीसांनी थेट केंद्र सरकारचं नाव घेतलं!
  • आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्या, जरांगे-भुजबळांना बोलवा, जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
  • तुम्हाला EWS, राज्याचं 10 टक्के आणि ओपनमधील 50 टक्के आरक्षण नको का? शिकलेल्या मराठ्यांनी उत्तर द्यावं, छगन भुजबळांचं आव्हान
  • मराठा आरक्षण अडचणीत? राज्य सरकारच्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान, दोन याचिका दाखल
  • मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरच्या GR बाबत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल; राज्य सरकारलाही विनंती
 जिल्हा

मुंबई शहर जिल्हास्तरीय ‘महिला लोकशाही दिन’ १५ सप्टेंबर रोजी

डिजिटल पुणे    13-09-2025 15:36:36

मुंबई : महिला व बालविकास विभागामार्फत समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांचे हक्क संरक्षित व्हावेत या उद्देशाने महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर आयोजित केला जातो.मुंबई शहर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात  १५ सप्टेंबर  रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुंबई शहर महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७, बी.बी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई येथे अर्ज करावा. असे मुंबई शहरच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी कळविले आहे.


 Give Feedback



 जाहिराती