सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; देवेंद्र फडणवीसांनी थेट केंद्र सरकारचं नाव घेतलं!
  • आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्या, जरांगे-भुजबळांना बोलवा, जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
  • तुम्हाला EWS, राज्याचं 10 टक्के आणि ओपनमधील 50 टक्के आरक्षण नको का? शिकलेल्या मराठ्यांनी उत्तर द्यावं, छगन भुजबळांचं आव्हान
  • मराठा आरक्षण अडचणीत? राज्य सरकारच्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान, दोन याचिका दाखल
  • मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरच्या GR बाबत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल; राज्य सरकारलाही विनंती
 शहर

महापालिका, जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या 'जनसंवाद' कार्यक्रमाचा प्रारंभ; प्रशासक राजमुळे नागरीकांच्या समस्यांमध्ये वाढ; 3 हजार 700 तक्रारींचा पाऊस

डिजिटल पुणे    13-09-2025 17:43:21

पुणे- महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आता स्वत: मैदानात उतरले असून राष्ट्रवादीच्या 'जनसंवाद' कार्यक्रमाचा प्रारंभ पुण्यातून हडपसर येथून करण्यात आला. स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण प्रशासक राजमुळे होत नाही त्यामुळे समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमात तब्बल 3 हजार सातशे तक्रार निवेदनांचा अक्षरशः पाऊस पडला. 'जनसंवाद' कार्यक्रमात नागरिकांच्या प्रतिसादामध्ये इछुक उमेदवारांची लुडबुड दिसून आली. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इछुकांनी निवेदने देण्याचा देखील प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकांचे कॅम्पेन ज्या कंपनीला देण्यात आले त्याच कंपनीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे कॅम्पेन दिलेले असून त्याच गुलाबी रंगाच्या माध्यमातून 'जनसंवाद' अभियानातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ पुण्यातून आज करण्यात आला. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्या मतदारसंघात आहेत त्या मतदारसंघात अशाप्रकारे अभियान राबविण्यात येणार आहे. 

राष्ट्रवादीच्या 'जनसंवाद' कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार चेतन तुपे पाटील यांनी आयोजन केले होते. 19 विविध विभाग निहाय टेबल करुन त्याठिकाणी संबंधित खात्याच्या अधिकारी बरोबर पक्षाचे कार्यकर्ते व कॅम्पेन राबविणाऱ्या कंपनीचे स्वयंसेवक नागरिकांना मदतीसाठी नियुक्त केलेले होते. हडपसर परिसरातील विविध भागातून नागरिकांनी उदंड प्रतिसाद या अभियानास दिला. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी बरोबर गृहनिर्माण संस्थांनी देखील या जनसुनावणीकडे धाव घेतली व वारंवार मागणी करुनही समस्यांचे निराकरण होत नाही अशा समस्या निवेदन देवून कथन केल्या. अशाप्रकारे तब्बल 3 हजार सातशे तक्रार निवेदने या कार्यक्रमात प्राप्त झाली. विविध विभागाकडे याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

 या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या व्यासपीठावरील फ्लेक्सवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा लोगो नाही. मात्र अजित पवारांच्या पार्टीचा पिंक कलर सर्वत्र वापरण्यात आला आहे. तर या कार्यक्रमाला शासना मधील सर्व अधिकारी उपस्थित आहे.यामुळे हा कार्यक्रम शासनाचा की पक्षाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्या कार्यक्रमापूर्वी अजित पवार  यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले,सर्वसामान्य लोकांना त्रास होत असतो. अशा कार्यक्रमामधून प्रश्न सुटायला मदत होत असते.त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठून तरी सुरुवात करायची असते म्हणून हडपसरमधून सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर अंजना कृष्णा यांच्या बाबत प्रश्न विचारताच अजित पवारांनी उत्तर देण टाळल्याचे पाहण्यास मिळाले.

राज्यभरात पुढील वर्षभर हा जनसंवाद कार्यक्रम राबविण्यात येणार असून, शक्यतो दर आठवड्याला एका मतदारसंघात त्याचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरी मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा (भाजप) असलेला प्रभाव लक्षात घेता अजित पवार 'राष्ट्रवादी'च्या विस्तारासाठी पवार यांनी पावले उचलल्याची चिन्हे दिसू लागली आहे. पवार यांनी त्यासाठी राज्यभराचा दौरा आयोजित करण्याचे नियोजन केले आहेत. शक्यतो 'राष्ट्रवादी' चा आमदार निवडून आलेल्या विधानसभा मतदारसंघात जनसंवाद कार्यक्रम आयोजित करून तेथील आमदारांना ताकद देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी 'व्हॉटसअॅप चॅट बॉट' तयार करण्यात आले आहे.

या क्रमाकांवर नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन करण्यात येते. त्यानुसार तक्रारींची वर्गवारी करून त्या सोडविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच्या सर्व स्थानिक विभागांना कार्यरत करणे, असे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात हडपसर विधानसभा मतदारसंघातून करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक आमदार चेतन तुपे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. स्थानिक नागरिकांकडून 'व्हॉट्सअॅप'वर सुमारे तीन हजार सातशे तक्रारी नोंदविल्या आहेत. पवार यांच्या उपस्थितीत या तक्रारींचे निरसन करण्यासाठी नेताजी सुभाष मंगल कार्यालयात सकाळी नऊ ते दुपारी दोन असे नियोजन केले होते. या काळात महापालिका, पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळणार असून, नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.

 


 Give Feedback



 जाहिराती