सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
  • विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर; उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
  • मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी, कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
 राज्य

दहशतवादी पाकिस्तानसोबत क्रिकेट हा शहिदांचा अपमान: आप

MSK    14-09-2025 05:22:10

रविवार १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियम येथे 'एशिया कप'  या क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथे पहलगाम घाटीत २६ निष्पाप लोकांची हत्या करण्यात केली होती.

 या पार्श्वभूमीवर आता राजकीय लढाई पण सुरू झाली आहे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने सुद्धा हा शहिदांचा अपमान आहे असे सांगत या सामन्याला विरोध दर्शविला आहे. 

' ज्या देशाने पहेलगाम येथे भारतीय २६ महिलांचे कुंकू पुसले त्याच दहशतवादी देशासोबत क्रिकेट खेळण्या मागे भाजपच्या मोदी सरकारची कोणती हतबलता, मजबुरी आहे? काही ठराविक आर्थिक हितसंबंधासाठी देशप्रेमाला तिलांजली आम्ही स्वीकारणार नाही. 

आम्ही सर्वांना याचा तीव्र निषेध आणि बहिष्कार करण्याचे आवाहन करतो!' असे सांगत आज आम आदमी पार्टी तर्फे पुण्यामध्ये शिवाजीनगर मेट्रो चौकामध्ये पाकिस्तानी क्रिकेट चा टी-शर्ट जाळण्यात आला.

यावेळेस आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, अभिजीत मोरे, सुरेखा भोसले,अनिकेत शिंदे,सुभाष कारंडे, रवीराज काळे, शितल कांडगावकर, प्रशांत कांबळे, रितेश निकाळजे, सुरेश भिसे, वैभव टेमकर, संग्राम पाटील आदी उपस्थित होते. 

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती