सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
  • खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
  • मुंबईकरांनो सावधान, पुढील तीन तास जपून, अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट
  • मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे, पाऊस अन् वाऱ्याचा वेग वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट
 जिल्हा

चाईल्ड केअर सामाजिक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    15-09-2025 11:02:32

उरण : चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगडची रविवार दिनांक १४/९/२०२५ रोजी वार्षिक महत्वाची सभा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष  विकास कडू यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाली.सभे मध्ये विविध विषयावर चर्चा झाली.नवदुर्गा सम्मान रायगड,विशेष सम्मान रायगड हे पुरस्कार वितरण सोहळा श्री रत्नेश्वरी मंदिर येथे होणार आहे,संस्थेचा ९ वर्धापण दिन मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात येणार आहे,९व्या वर्धापन दिन निमित्य रायगड मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना रायगड रत्न हा पुरस्कार देण्यात येणार आहेत,उरण, पनवेल, पेण,कर्जत, अलिबाग, महड या तालुक्यात विशेष कार्य करणाऱ्यांना तालुका रत्न हा पुरस्कार देण्यात येणार आहे.असे आदी निर्णय एकमताने घेण्यात आले.सभे मध्ये संस्थेची प्रामुख्याने फेर निवड झाली. प्रकाश ठाकूर (धुतम, उरण)यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आलीतर सह सचिव पदी सचिन गावंड (पेण)यांची निवड करण्यात आली. तसेच  हितेश म्हात्रे (जसखार, उरण)यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.सर्व नवनिर्वाचीत पढाधिकाऱ्यांना संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.


सभेची प्रस्थावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांनी केली.ते सभासदांना मार्गदर्शन करताना म्हणाले की समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन ह्या चाईल्ड केअर सामाजिक संस्था ची स्थापना केली, सुरुवातीला ही संस्था फक्त उरण तालुक्या मर्यादित काम करत राहिली नंतर संस्थेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात समाजसेवेचे कार्य सुरु केले, आज ही संस्था रायगड नव्हे तर महाराष्ट्र भर गाजत आहे.तसेच पेण तालुका अध्यक्ष कैलासराजे घरत यांनी सभेला मार्गदर्शन करताना खूप मोलाचे सल्ले दिले चाईल्ड केअर सामाजिक संस्था ही संस्था नवाव्या वर्षात पदार्पण करत आहे. कुठल्याही संस्थेला ९ वर्ष झाली म्हणजे त्या संस्थेचे कार्य आफाट आहे. त्या त्या बद्दल संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. तसेच सभासदांनी या संस्थेसाठी थोडा फार तरी वेळ काढावा ही विनंती करतोआपण सामाज्याची काही तरी देणे लागतो त्या नुसार प्रत्येकाने खारू ताई च्या रूपाणी का होईना समाजसेवेत सहभाग घ्यावा.

असे आवाहन कैलासराजे घरत यांनी केले.सभेचे आभार प्रदर्शन विवेक पाटील यांनी केले.या सभेसाठी विविध तालुक्यातून पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी विकास कडू,विवेक पाटील,विक्रांत कडू,मनोज ठाकूर,प्रकाश ठाकूर,रोशन घरत,कैलास राजे घरत,विनायक म्हात्रे,विजेंद्र पाटील,राजेश ठाकूर,विश्वनाथ घरत,भूषण कडू,समीर पाटील,धीरज घरत,सचिन गावंड,हितेश म्हात्रे,विवेक कडू,भूषण भोईर,विपुल कडू,आमोल डेरे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.अशा प्रकारे चाईल्ड केअर सामाजिक संस्थेची वार्षिक सभा अत्यंत उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.


 Give Feedback



 जाहिराती