सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
  • खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
  • मुंबईकरांनो सावधान, पुढील तीन तास जपून, अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट
  • मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे, पाऊस अन् वाऱ्याचा वेग वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट
 DIGITAL PUNE NEWS

पूजा खेडकरचे आई-बाप फरार, घराबाहेर आलेले दोन डब्बे कोणासाठी? पोलिसांकडून तपास सुरू

डिजिटल पुणे    15-09-2025 16:15:09

पुणे : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांचे कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहे. नवी मुंबईतून अपहरण झालेला ट्रकचा हेल्पर खेडकर यांच्या पुण्यातील घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस तपासासाठी पुण्यातील घरात पोहचले असता घरमालकीण मनोरमा दिलीप खेडकर हिने पोलिसांना घरात प्रवेश नाकारला, गेट बंद करून सरकारी कामात अडथळा आणला. दरम्याना, अखेर पोलिसांनी घराच्या गेटवरुन उडी ठोकत प्रवेश मिळवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांलगाच चर्चेत आला आहे.

 नवी मुंबईतून सुरू झालेल्या एका अपघाताच्या घटनेनंतर प्रकरणात नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबावर आता अपहरण, पोलिसांशी अरेरावी आणि आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पूजा खेडकरच्या घराबाहेर लावलेली नोटीस खेडकर कुटुंबाने फाडल्याचे समोर आले असून, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर हे अपहरणासाठी वापरलेली गाडी घेऊन सध्या फरार आहेत.

दरम्यान, खेडकरांच्या पुण्यातील बंगल्यात दोन जेवणाचे डबे पोहोचले आहेत, यामुळे चर्चेला नवे फाटे फुटले आहेत. बंगल्याचा गेट बंद असल्याने हे डबे सुरक्षा भिंतीवर ठेवण्यात आले. काही वेळातच एक कर्मचारी तिथे आला आणि हे डबे उचलून निघून गेला. या पार्श्वभूमीवर, हे जेवण नेमके कोणासाठी मागवले गेले होते? दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर अजूनही बंगल्यात लपून बसले आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोलिसांनी बंगल्यात उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाब नोंदवले असून, फरार असलेल्या दिलीप आणि मनोरमा खेडकरांचा शोध सुरूच आहे. आता दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकरला पोलीस नेमके कधी ताब्यात घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुलुंड ते ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 क्रमाकांच्या कारचा शनिवारी सायंकाळी अपघात झाला. ट्रकचालक चंदकुमार चव्हाण आणि त्याचा हेल्पर प्रल्हाद कुमार हे दोघे ट्रकामध्ये होते. कारमध्ये दोन व्यक्ती होत्या. अपघातानंतर दोन्ही बाजूने वाद झाला. ट्रकमधील हेल्पर प्रल्हाद कुमार याला कारमधील दोघांनी जबरदस्तीने त्यांच्यासोबत बसून घेतले.

यानंतर कारमागे ट्रक आणण्याच्या सूचना ट्रक चालक चंदकुमार याला केल्या. ट्रक चालक कारमागे ट्रक घेऊन चालला होता. पण पुढे काही वेळाने कार ट्रक चालकाच्या नजरेआड झाली. या प्रकाराने गोंधळलेल्या ट्रक चालक चंदकुमार याने मालक विलास ढेंगरे यांना दिली. ढेंगरे यांनी नवी मुंबईच्या रबाळे पोलिस ठाण्यात धाव घेत अपहरणाची तक्रार दिली.कारचा MH 12 RP 5000 शोध घेतला. ही कार पुण्यात पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या घरी उभी असल्याची माहिती मिळाली. नवी मुंबई पोलिसांचे पथक कारवाई करत तिथं पोचले. तेव्हा पूजा खेडकर यांच्या आईने घराचे प्रवेशद्वार उघडण्यास नकार दिला.गेट बंद करून सरकारी कामात अडथळा आणला, आरोपी आणि गुन्ह्यातले पुरावे (कार) लपवली आणि भितीदायक कुत्रे सोडून पोलिसांना धमकावले!

या संपूर्ण प्रकारानंतर, मनोरमा खेडकर यांच्यावर चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि आरोपीला पळवून लावणे अशा गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, खेडकर कुटुंबाने मुंबई पोलिसांनी लावलेली नोटीस फाडल्याचेही समोर आले आहे. सध्या दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे अपहरणासाठी वापरलेल्या गाडीसह फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 


 Give Feedback



 जाहिराती