सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी साहेब, दादा, ताई पुन्हा एक व्हा, नागपुरातील फ्लेक्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष
  • अतिवृष्टीचा दणका, बळीराजाला फटका! पिकात छातीएवढं पाणी, सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टक शेती पाण्याखाली
  • बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा
  • मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली
  • पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; मध्यरात्री घायवळ टोळीकडून भररस्त्यात फायरींग, एक गंभीर जखमी
 शहर

अनंतराव पवार महाविद्यालयात अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त 'एआय आणि करिअरच्या संधीं'वर परिसंवाद

डिजिटल पुणे    18-09-2025 10:34:03

पुणे : निलया फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार (MOU) – विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी नवी दिशा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि करिअरच्या संधी’ या विषयावर एक दिवसीय परिसंवाद उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC), स्पर्धा परीक्षा केंद्र आणि विद्यार्थी समुपदेशन कक्षाच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले. प्रमुख वक्त्या श्रीमती गौरी कुलकर्णी-नाईक यांनी विद्यार्थ्यांना एआयमुळे रोजगार क्षेत्रात होणारे बदल, उदयोन्मुख भूमिका आणि त्यासाठी आवश्यक कौशल्ये या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी एआयच्या व्यावहारिक उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी अधिक व्यापक पद्धतीने समजावून सांगितल्या.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी एआय तंत्रज्ञान आत्मसात करणे अपरिहार्य असल्याचे सांगितले. त्यांनी निलया फाऊंडेशन, पुणे सोबतच्या सहकार्याचे कौतुक केले व अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट करण्याच्या महत्त्वावर भर दिला.याच वेळी, अनंतराव पवार महाविद्यालय व निलया एज्युकेशन ग्रुप यांच्यात पुढील ५ वर्षांसाठी सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या करारानुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी सेमिनार, कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

काही कार्यक्रम सामाजिक उपक्रम म्हणून विनाशुल्क उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक कौशल्येही मिळणार असून भविष्यातील स्पर्धात्मक जगात यश मिळवणे सोपे होणार आहे.या करारासाठी IQAC समन्वयक डॉ. तानाजी काशीद आणि डॉ. श्रीकांत देशमुख यांनी परिश्रम घेतले, तर प्रा. भरत कानगुडे आणि प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांचे मार्गदर्शन लाभले. परिसंवादाचा समारोप व आभार प्रदर्शन डॉ. तानाजी काशीद यांनी केले.हा परिसंवाद व सामंजस्य करार विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या दालनांचे दरवाजे उघडणारा ठरला असून, महाविद्यालयाच्या ‘नॅक’ (NAAC) मूल्यांकनातही सकारात्मक योगदान देणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती