पुणे : ‘रस्ता न दिल्याच्या’ वादातून निलेश घायवळ गँगकडून मध्यरात्री गोळीबार करण्यात आला. यामध्ये एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पुण्यात एकिकडे कोमकर आंदेकर खून प्रकरण ताजे असतानाच मध्यरात्री पुन्हा फायरिंगची घटना घडल्यामुळे शहरातील सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, मध्यरात्री घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
घायवळ टोळीतील मयूर कुंबरे याने थेट गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या घटनेसह आरोपींनी आणखी एका सामान्य नागरिकावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.कोथरूड परिसरात कुख्यात निलेश घायवळ टोळीच्या सदस्यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीवर गोळीबार केला.गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत. सध्या त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही जीवघेणी कारवाई करण्यात आली.गोळीबार होताच जीव वाचवण्यासाठी प्रकाश धुमाळ जवळील एका इमारतीकडे धावले. यावेळी स्थानिक सचिन गोपाळघरे यांनी धुमाळ यांना मदत केली. घायवळ टोळीतील मयूर कुंबरे याने थेट गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान हा घटनेसह आरोपींना आणखी एका सामान्य नागरिकावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. कोयत्याने वार केल्याची घटना पंधरा वीस मिनिटांच्या कालावधीतच घडली.
आम्ही इथले भाई आहोत
प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर याच आरोपींनी वैभव साठे या आणखी एका नागरिकावर कोयत्याने वार केलेत. प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे गुन्हेगार सागर कॉलनी या ठिकाणी गेले आणि तिथे उभ्या असलेल्या वैभव साठे यांच्यावर विनाकारण हल्ला केला आहे. निलेश घायवळ टोळीतील हे गुन्हेगार हल्ला करताना “आम्ही इथले भाई आहोत” असं म्हणत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते.
आधी गोळीबार नंतर कोयत्याने मारहाण
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, , ही घटना काल रात्री कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी केवळ गोळीबार नाही केला तर अजून एकाला कोयत्याने मारहाण देखील केली आहे. काल रात्री या आरोपींनी दोन जणांना मारहाण केली आहे. काल रात्री १२ च्या दरम्यान गोळीबार घडला आणि त्यानंतर याच आरोपींनी अजून एका व्यक्तीला कोयत्याने मारहाण केली आहे. प्रकाश धुमाळ अस गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर वैभव साठे याला कोयत्याने मारहाण केली. चार आरोपी दोन गाड्यांवर आले आणि गोळीबार केला.
आम्ही इथले भाई आहोत म्हणत गोळीबार केला. एक गोळी फायर केली होती आणि ती त्या इसमाच्या मांडीवर लागली. याच आरोपींनी रात्री अजून एकाला कोयत्याने मारत जखमी केलं आहे. हे सगळे घायवळ टोळीचे सदस्य आहेत. हे सगळे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत काल रात्री २ गुन्हे यांच्यावर दाखल केले आहेत. अनेक मोका आणि ३०७ या आरोपींवर याआधी दाखल आहेत. निलेश घायवळ याचा काही सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे.
मयूर कुंबरे, गणेश राऊत, रोहित आखाडे, मुसा शेख आणि इतर काही आरोपींवर गुन्हा दाखल असून यांना ताब्यात घेतले आहेत. मारणे टोळीवर याआधी मोका लावला आहे यात देखील योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.