सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले; उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा
  • महाराष्ट्राची नक्षलमुक्तीच्या दिशेनं वाटचाल; सोनू उर्फ भूपतीसह 60 जणांची शरणागती, मुख्यमंत्र्यांनी संविधानाची प्रत दिली
  • लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला
 शहर

जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात; पीएमटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू

डिजिटल पुणे    14-10-2025 13:02:57

पुणे : जुन्या कात्रज घाटात आज (मंगळवार) सकाळी सुमारे ८:४० वाजता भिलारेवाडी वळणाजवळ पीएमटी बस आणि हिरो होंडा पॅशन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

जुन्या कात्रज घाटात आज (मंगळवार) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी सुमारे ८.४० वाजता भिलारेवाडी वळणाजवळ घडला.मिळालेल्या माहितीनुसार, पीएमटी बस (क्र. MH14/HU/6432) आणि हिरो होंडा पॅशन मोटारसायकल (क्र. MH12/FB/0348) यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत मोटारसायकलवरील आकाश रामदास गोगावले (वय 29, रा. ससेवाडी, भोर) आणि अनुष्का प्रकाश वाडकर (वय 27) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर नेहा कैलास गोगावले (वय 20) ही गंभीर जखमी असून तिच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर पीएमटी बसचालक सुधीर दिलीप कोंडे (वय 42, रा. आर्वी, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती