सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले; उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा
  • महाराष्ट्राची नक्षलमुक्तीच्या दिशेनं वाटचाल; सोनू उर्फ भूपतीसह 60 जणांची शरणागती, मुख्यमंत्र्यांनी संविधानाची प्रत दिली
  • लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला
 जिल्हा

‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’साठी प्रस्ताव सादर करण्यास २५ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

डिजिटल पुणे    15-10-2025 15:56:40

मुंबई : आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ तसेच ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’ देण्यात येतात.या पुरस्कारांसाठी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त व्यक्ती आणि संस्थानी प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करावेत असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले आहे.

मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार देण्याकरिता गठीत समितीची बैठक झाली. या बैठकीस आमदार डॉ. किरण लहामटे, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, सहसचिव मच्छिंद्र शेळके उपस्थित होते.

मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याचा व्यापक प्रसार करणे तसेच आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करून इतरांना प्रेरणा देणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे.

2023-24 आणि 2024-25 या वर्षांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले असून, प्रकल्प कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2025 असून 30 ऑक्टोबर २०२५ पर्यंत या पुरस्कारांची छाननी प्रक्रिया होणार आहे. अधिक माहितीसाठी व्यक्ती व संस्थांनी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती