सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा शहरात आगमनानंतर शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यान येथे पुष्पचक्र अर्पण करुन शहीद जवानांना अभिवादन केले.या प्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.शहीद जवानांना अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वीर माता, वीर पत्नी यांचा सत्कार केला. यानंतर त्यांनी शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानाची पहाणी केली. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी स्मृती उद्यानाची माहिती देऊन याच्या उभारणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिल्याचे सांगितले.