सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
  • 'आम्ही पराकाष्ठा करू, आरक्षणाला धक्का लागणार नाही'
  • मी 18 पैकी 16 निवडणुका जिंकल्या; मागच्या दाराने कधीच गेलो नाही, माझे वडील काही मंत्री नव्हते, ना खासदार होते, चिखलीकरांची अशोक चव्हाणांवर टीका
  • मोठी बातमी: भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • राज्य सरकारची शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याची तयार नसल्याने काळी दिवाळी साजरी करावी लागतेय: शरद पवार
 जिल्हा

कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

डिजिटल पुणे    17-10-2025 16:50:14

मुंबई  : कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानानेयुक्त बोटी लवकरच मुंबईत दाखल होतील. यामुळे मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात नवी क्रांती होईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई’च्या स्वप्नपूर्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. मुंबईत कॅन्डेलाची पर्यावरणपूरक जलवाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांना नव्या प्रकारचा प्रवास अनुभव मिळेल आणि किनारा भागातील जोडणी अधिक मजबूत होईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतूक, किनारा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढून नवीन रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

मंत्री राणे यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला सी 8 आणि पी 12 या अत्याधुनिक बोटींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या बोटी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून पाण्यावरून ग्लाइड होतात, त्यामुळे त्या वेगवान, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहेत. लवकरच पी 12 बोट मुंबईत दाखल होणार असून, यामुळे राज्यातील जलवाहतुकीत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

या भेटीदरम्यान कॅन्डेला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हसेलकोग तसेच मुख्य व्यवसाय अधिकारी नकुल विराट यांनी कंपनीच्या तांत्रिक नवकल्पना आणि उत्पादन प्रक्रियेची सविस्तर माहिती मंत्री राणे यांना दिली. महाराष्ट्रात कॅन्डेलाचे उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबतही प्राथमिक चर्चा करण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती