सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
  • 'आम्ही पराकाष्ठा करू, आरक्षणाला धक्का लागणार नाही'
  • मी 18 पैकी 16 निवडणुका जिंकल्या; मागच्या दाराने कधीच गेलो नाही, माझे वडील काही मंत्री नव्हते, ना खासदार होते, चिखलीकरांची अशोक चव्हाणांवर टीका
  • मोठी बातमी: भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • राज्य सरकारची शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याची तयार नसल्याने काळी दिवाळी साजरी करावी लागतेय: शरद पवार
 जिल्हा

शेलघर येथे मंगळवारी `दिवाळी पहाट’! कैलास मानसरोवर यात्रेवर आधारित `सुखकर्ता’ दिवाळी अंकाचे प्रकाशन!

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    17-10-2025 17:30:08

उरण : सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी `दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी पनवेल तालुक्यातील उलवा नोडमध्ये सर्वप्रथम सुरुवात केली. ही परंपरा जपण्यासाठीच 'यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्था' आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पनवेल तालुक्यातील शेलघर येथे `दिवाळी पहाट’ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम मंगळवारी (ता.२१) सकाळी सात वाजता होणार आहे.

'इंडियन आयडाल’ सागर म्हात्रे, `होऊ दे धिंगाणा फेम’ विनल देशमुख, `सूर नवा ध्यास नवा फेम’ श्वेता म्हात्रे, तृप्ती दामले यांच्या बहारदार गायनाने `दिवाळी पहाट’ रंगणार आहे. विशेष म्हणजे `लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटाची टीमही यावेळी उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, `दिवाळी पहाट’ कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद होणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युनियनची पत्रकार परिषद ही १९९० पासूनची प्रथा आहे. या पत्रकार परिषदेत कामगारांसाठी वर्षभरात केलेले करार आणि विविध कंपन्यांमधील बोनसचा आढावा घेतला जातो. तसेच पत्रकार बांधवांनी आपापल्या वृत्तपत्रांत दिलेल्या बातम्यांबद्दल धन्यवाद मानले जातात. ही प्रथा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्याही दिवाळी मिठाई देऊन गोड केली जाते. यावेळी दिवाळी अंकांचा साहित्यिक वारसा जपण्यासाठीच यंदा पहिल्यांदाच 'सुखकर्ता’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन होणार आहे. हा दिवाळी अंक `कैलास मानसरोवर’ या विषयाला वाहिलेला आहे. दोन वेळा कैलास मानसरोवर यात्रा करणारे महेंद्रशेठ घरत हे बहुआयामी अवलिया आहेत. त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रेचे महत्त्व, त्यांचे अनुभव, तसेच इतरही ज्यांनी कैलास मानसरोवर यात्रा केली आहे, त्यांच्या अनुभवाची शिदोरी वाचकांना देण्याचा प्रयत्न `सुखकर्ता’ या दिवाळी अंकातून करण्यात आला आहे.  शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाज मंदिर सभागृहाच्या हिरवळीवर हे कार्यक्रम रंगणार आहेत.  

शेलघर येथील `यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्थे’ची मोलाची भूमिका सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी असल्याने रसिकांनी आणि पत्रकार बांधवांनी या सामाजिक चळवळीचा वसा जपण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती