सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • निवडणुकांमध्ये मूळ ओबीसीला फटका बसणार, ज्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले ते सगळ्या जागा घेऊन जाणार : वडेट्टीवार
  • मोठी बातमी: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती
  • पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण व्यवहाराला स्थगिती देण्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांचे आदेश
  • कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरुन नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
  • शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
 जिल्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा

डिजिटल पुणे    20-10-2025 12:57:02

मुंबई : दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, यंदा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे, शेतीचे तसेच पशुधनाचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकट काळात आपल्या शेतकरी व पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांचे जीवन पुन्हा उजळविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करुया. अतिवृष्टी व पूरबाधित बांधवांना मदत करून त्यांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याची महाराष्ट्राची सामाजिक परंपरा कायम राखूया.

दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा उजेड नव्हे, तर मनातील अंधार दूर करण्याचा संकल्प आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय आणि अनिष्ट रुढी-प्रथांचा अंधार दूर करून विवेक, ज्ञान आणि प्रगतीचा प्रकाश आपल्या जीवनात आणूया. सामाजिक ऐक्य, बंधुता आणि सौहार्द यांची भावना दृढ करण्याचा हा सण आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी प्रगती, विकास आणि सहकार्याच्या वाटेवर एकत्र चालावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो. दिवाळीच्या या प्रकाशासोबत आपल्या राज्यात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरु व्हावा, अशा सदिच्छा व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.


 Give Feedback



 जाहिराती