सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • निवडणुकांमध्ये मूळ ओबीसीला फटका बसणार, ज्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले ते सगळ्या जागा घेऊन जाणार : वडेट्टीवार
  • मोठी बातमी: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती
  • पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण व्यवहाराला स्थगिती देण्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांचे आदेश
  • कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरुन नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
  • शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
 जिल्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कर्डीले कुटुंबीयांचे सांत्वन

डिजिटल पुणे    20-10-2025 13:11:22

अहिल्यानगर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुऱ्हाणनगर येथे दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निवासस्थानी भेट देऊन  त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले, आमदार संग्राम जगताप तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिवंगत शिवाजी कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.याप्रसंगी आमदार काशिनाथ दाते, आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, दिवंगत शिवाजी कर्डीले यांचा लोकसंपर्क अत्यंत दांडगा होता. सरपंच पदापासून ते इथंपर्यंतचा प्रवास त्यांनी अत्यंत संघर्षातून केला. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी झाली असून कधीही भरून न निघणारी अशी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर झटणारे नेतृत्त्व होते. त्यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या मनात कायमचा ठसा उमटविला.


 Give Feedback



 जाहिराती