सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • निवडणुकांमध्ये मूळ ओबीसीला फटका बसणार, ज्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले ते सगळ्या जागा घेऊन जाणार : वडेट्टीवार
  • मोठी बातमी: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती
  • पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण व्यवहाराला स्थगिती देण्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांचे आदेश
  • कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरुन नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
  • शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
 व्यक्ती विशेष

खासदार मेधा कुलकर्णींवर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा — अजित पवार गटाची मागणी

डिजिटल पुणे    20-10-2025 15:33:44

पुणे : पुण्यात भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे, असा गंभीर आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

शनिवारवाड्यात महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या विरोधात काल काही संघटनांकडून निदर्शने करण्यात आली होती. या प्रकरणाची संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. दरम्यान याप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली. शनिवारवाड्यामध्ये काही महिलांनी सामूहिक प्रार्थना केली. त्याचा व्हिडिओ रविवारी समाज माध्यमावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ एक-दोन दिवसांपूर्वीचा आहे. त्यानंतर काही संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या आवारात निदर्शने केली. शनिवारवाडा ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची वास्तू आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याकडून रात्री तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 

गुन्हा दाखल करा

रूपाली पाटील ठोंबरे  म्हणाल्या की, पुण्यातील शांतता आणि ऐक्य धोक्यात येईल असे वक्तव्य मेधा कुलकर्णी करत आहेत. त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहेत. पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम त्या करत आहेत. कोथरूडमध्ये नाटकं केली, आता कसब्यातून पुन्हा वातावरण पेटवायचा प्रयत्न सुरू आहे.

पुण्यातील धार्मिक वातावरण

रूपाली पाटील पुढे म्हणाल्या, शनिवारवाडा कोणाच्या बापाचा नाही. तो मराठा साम्राज्याच्या पेशव्यांचा आणि सर्व पुणेकरांचा आहे. खासदार बाईंनी केलेल्या कृत्यामुळे पुण्यातील सौहार्द धोक्यात येत आहे. त्यांनी शनिवारवाड्यात जे नाटक केलं, त्यावर तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा. भाजपनेही त्यांना आवर घालावा. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, खासदारकीची घेतलेली शपथ विसरून मेधा कुलकर्णी पुण्यातील धार्मिक वातावरण जाणीवपूर्वक बिघडवतात. त्यांच्या अशा कृत्यांना आळा घालणं गरजेचं आहे. प्रार्थना असो किंवा दुवा — श्रद्धा एकच असते, हे त्या विसरत आहेत.

राजकीय वातावरण चांगलंच तापलं

पुण्यात सध्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राष्ट्रवादीकडून कारवाईची जोरदार मागणी होत आहे. पुण्यात भाजपने खासदार मेधा ताई यांना आवरा बाबा, असं देखील रूपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. पुण्यात भाजपने खासदार मेधा ताई यांना आवरा बाबा. शनिवारवाडा ही वास्तू कोणाच्या बापाचा नाही. शनिवारवाडा मराठा साम्राज्य, पेशव्यांचा आहे. पुणेकर सर्व जाती धर्मांचे आहेत. मेधा कुलकर्णी पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांचं वातावरण खराब करत आहेत. जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहे.त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहे,अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.


 Give Feedback



 जाहिराती