सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
  • "विकासाच्या नावाखाली मतांची खरेदी" सरकारकडून न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे गुंडांकडून…रोहित पवारांचा प्रहार
  • रात्री अचानक महापूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं...; पत्र्याच्या शेडमध्येच भावाला ओवाळायची वेळ, भाऊबीजेलाही बहीण भावाच्या डोळ्यात पाणी
  • निलेश घायवळला मोठा झटका; पासपोर्ट अखेर केला रद्द, पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी
  • राज्यात दूध भेसळीचा कहर, उकळी आणताच चक्क रबर तयार!
  • आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता! काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर संजय राऊतांचा 'रोखठोक' टोला, बिहारचाही आरसा दाखवला
  • ताजमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून गेल्याने महिलेला अपमानास्पद वागणूक, सलवार कमीज अन् मांडी घालून बसण्यावरूनही सुनावलं
 जिल्हा

पत्रकारांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होणारे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या माध्यमातून दरवर्षी पत्रकार परिषदेचे आयोजन

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    23-10-2025 11:07:15

उरण : सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी `दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी उलवा नोडमध्ये सर्वप्रथम सुरुवात केली. ही परंपरा जपण्यासाठीच 'यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्था' आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शेलघर येथे `दिवाळी पहाट’ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम मंगळवारी (ता.२१) सकाळी ७ ते ११ या वेळेत मोठया उत्साहात संपन्न झाला.
'इंडियन आयडाल’ सागर म्हात्रे, `होऊ दे धिंगाणा फेम’ विनल देशमुख, `सूर नवा ध्यास नवा फेम’ श्वेता म्हात्रे, तृप्ती दामले यांच्या बहारदार गायनाने `दिवाळी पहाट’ कार्यक्रम मोठया उत्साहात रंगला होता.विशेष म्हणजे `लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटाची टीमही यावेळी उपस्थित होती. `दिवाळी पहाट’ कार्यक्रमानंतर शेळघर मधील समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली.
 
सुरवातीला न्यू मॅरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील यांनी प्रस्तावना केली. या प्रस्तावनेत त्यांनी कामगार संघटनेची माहिती, यशस्वी घोड दौड इत्यादी विषयी माहिती दिली.या नंतर न्यू मॅरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी  सामाजिक राजकीय कामगार क्षेत्रातील उपलब्धी संबंधी हितगुज करून वर्षभरात विविध कंपनी मध्ये झालेले वेगवेगळे करार, बोनस, संघटनेचे विस्तार याविषयी माहिती दिली.पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक आहे. पत्रकारांमुळेच आम्हाला प्रसिद्धी मिळते.
 
आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते.न्यू मॅरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी घोडदौड मध्ये  पत्रकारांचा महत्वाचा वाटा आहे. महत्वाचे योगदान आहे त्यामुळे पत्रकारांचा यथोचित मानसन्मान करण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येते अशी माहिती महेंद्रशेठ घरत यांनी दिली.व्यासपीठावर कामगार नेते महेंद्रशेठ घरत,कार्याध्यक्ष पी के रामण, सरचिटणीस वैभव पाटील, किरीट पाटील, जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील, जेष्ठ पत्रकार दा.चा कडू,रायगड जिल्हाध्यक्ष रेखा घरत आदि मान्यवर उपस्थित होते.जेष्ठ पत्रकार दा.चा. कडू यांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे आभार व्यक्त केला. कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत हे संपूर्ण महाराष्ट्रात असे एकमेव नेते आहेत कि जे पत्रकारांसोबत दरवर्षी दिवाळी साजरा करतात. पत्रकारांच्या सुखदुःखात सहभागी होतात. पत्रकारांना नेहमी मदत करतात. त्यांच्या सारखा नेत्यांची सर्वांना गरज आहे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार दा.चा.कडू यांनी केले. पत्रकारांना नेहमी मान सन्मान देत असल्याने जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील यांनीही महेंद्र घरत यांचे पत्रकारांच्या वतीने आभार मानले.
 
 
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युनियनची पत्रकार परिषद दरवर्षी घेतली जाते.ही १९९० पासूनची प्रथा आहे. या पत्रकार परिषदेत कामगारांसाठी वर्षभरात केलेले करार आणि विविध कंपन्यांमधील बोनसचा आढावा घेतला जातो. तसेच पत्रकार बांधवांनी आपापल्या वृत्तपत्रांत दिलेल्या बातम्यांबद्दल धन्यवाद मानले जातात. ही प्रथा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधून त्यांचीही दिवाळी मिठाई देऊन गोड केली जाते. यावेळी दिवाळी अंकांचा साहित्यिक वारसा जपण्यासाठीच यंदा पहिल्यांदाच 'सुखकर्ता’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन कामगार नेते महेंद्र घरत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.हा दिवाळी अंक `कैलास मानसरोवर’ या विषयाला वाहिलेला आहे. दोन वेळा कैलास मानसरोवर यात्रा करणारे महेंद्रशेठ घरत हे बहुआयामी अवलिया आहेत. त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रेचे महत्त्व, त्यांचे अनुभव, तसेच इतरही ज्यांनी कैलास मानसरोवर यात्रा केली आहे, त्यांच्या अनुभवाची शिदोरी वाचकांना देण्याचा प्रयत्न `सुखकर्ता’ या दिवाळी अंकातून करण्यात आला आहे.
 
शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषद संपन्न झाली.या प्रसंगी रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती झाल्याने कामगार नेते महेंद्रशेठ घरत व जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील, जेष्ठ पत्रकार दा. चा. कडू यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शेलघर येथील `यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्थे’ची मोलाची भूमिका सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी असल्याने रसिकांनी आणि पत्रकार बांधवांनी या सामाजिक चळवळीचा वसा जपण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन महेंद्रशेठ घरत आणि  शुभांगीताई घरत यांनी केले होते. या आवाहनाला विविध रसिक प्रेषक, पत्रकारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे पाहावयास मिळाले.
 


 Give Feedback



 जाहिराती